लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतून ४२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे १०९ उमेदवार कायम असून, त्यांच्यात आमदारकीची टशन रंगणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यानुसार जिल्ह्यात दाखल १५१ उमेदवारांच्या अर्जांपैकी ४२ अर्ज मागे घेण्यात आले आहेत.धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात छाननीनंतर रिंगणात असलेल्या २३ जणांपैकी रमेश गजबे (अपक्ष), संदीप धवने (अपक्ष), रामभाऊ गाडेकर (अपक्ष) या तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता २० उमेदवार कायम आहेत.बडनेरा मतदारसंघात २८ जणांपैकी प्रवीण महादेवराव सरोदे (विकास इंडिया पार्टी), राहुल लक्ष्मण मोहोड (बहुजन महा पार्टी), संजय देवरावजी महाजन (रिपाइं खोब्रागडे), नीलेश पुरुषोत्तम येते (अपक्ष), पुरुषोत्तम उत्तमराव भटकर (अपक्ष), राजू बक्षी जामनेकर (अपक्ष), शैलेश अभिमान गवई (अपक्ष), सिद्धार्थ गोंडाणे (अपक्ष), सैयद इरफान सैय्यद अमीर (अपक्ष), संजय भोंडे (अपक्ष) या १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, १८ उमेदवार कायम आहेत.अमरावती मतदारसंघात २५ जणांपैकी संजय हिरामण आठवले (बहुजन विकास आघाडी), मेहराज खान पठाण (अपक्ष), नलिनी सचिन तायडे (अपक्ष), राहुल माणिकराव देशमुख (अपक्ष), अशोक पूर्णाजी टेंभरे (अपक्ष) या पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. २० उमेदवार रिंगणात आहेत.तिवसा मतदारसंघात १६ जणांपैकी सिंधू विलास इंगळे (बहुजन महापार्टी), भीमराव काशीराव कोरडकर (राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी), सुरेश मारोती उंदरे (अपक्ष), नरेंद्र बाबूलाल कठाणे (अपक्ष), संजय पंजाब कापडे (अपक्ष), भारत शरद तसरे (अपक्ष) या सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता १० उमेदवार विजयासाठी लढत आहेत.दर्यापूर मतदारसंघात २० अर्ज पात्र ठरले होते. सोमवारी गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), सुधाकर दत्तुजी तलवारे (अपक्ष), भूषण अनिल खंडारे (अपक्ष), गजानन मोतीराम लवटे (अपक्ष), आयेशा बानो रशीद खान (अपक्ष), सागर ज्ञानेश्वर कलाने (अपक्ष), दिलीप साहेबराव गवई (अपक्ष), गोपाळ रामकृष्ण चंदन (अपक्ष), नीलेश गजानन राक्षसकर (अपक्ष) या नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर ११ उमेदवार कायम आहेत.मेळघाट मतदारसंघात १० जणांपैकी अशोक मारोती केदार (अपक्ष), रवि रामू पटेल (अपक्ष) या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता निवडणूक
रिंगणात आठ उमेदवार कायम आहेत.अचलपूर मतदारसंघात छाननीअंती १५ अर्ज पात्र ठरले. यापैकी अंकुश गोहाड (अपक्ष), अक्षरा लहाने (अपक्ष), अनुष्का बेलोरकर (अपक्ष), गिरीधर रौराळे (अपक्ष) या चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ११ उमेदवार कायम आहेत.मोर्शी विधानसभा मतदारसंघात १४ जणांपैकी गिरीश कराळे (अपक्ष), नंदकिशोर कुयटे (अपक्ष) व नंदकुमार हिंगवे (अपक्ष) या तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उर्वरित ११ उमेदवार रिंगणात आहेत.धामणगाव, बडनेरा, अमरावतीमध्ये दोन बॅलेट युनिटधामणगाव रेल्वे मतदारसंघात २०, बडनेरा १८ व अमरावती मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात आहेत. एक बॅलेट युनिटवर १५ उमेदवार व एक नोटा असे १६ उमेदवार राहू शकतात. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लागणार आहे. कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मात्र एकच राहणार आहे. वाढीव इव्हीएमसाठी जिल्हा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. या व्यतिरिक्त तिवसा मतदारसंघात १०, दर्यापूर ११, मेळघाट ८, अचलपूर ११ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात १० पेक्षा कमी उमेदवार असल्याने एकाच बॅलेट युनिटवर मतदान होणार आहे. उमेदवार संख्या निश्चिती झाल्यामुळे टपाली मतपत्रिका, मतपत्रिका व इटीपीबीएसद्वारे मतपत्रिका यासाठी आता आठही मतदारसंघांतील कामेही गतिमान होणार आहेत.