शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेलगत वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 1:16 AM

मेळघाटला अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाने ग्रासले असतानाच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाभागात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीची भयावहता बघता, दोन्ही राज्यांतील वनअधिकाºयांच्या बैठकांवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.

ठळक मुद्देनियमित अधिकारी नाही : दोन्ही राज्यांतील वनाधिकाऱ्यांच्या बैठकी नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटला अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाने ग्रासले असतानाच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाभागात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीची भयावहता बघता, दोन्ही राज्यांतील वनअधिकाºयांच्या बैठकांवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.मध्यप्रदेश वनविभागाच्या अधिकाºयांनी महाराष्ट्रात परतवाडा-बहिरम रोडवरील निंभोरा फाट्याजवळ तीन ते चार लाखांचे अवैध सागवान पकडले. यानंतर जारिदा वनपरिक्षेत्रातून आलेला मालही याच वनअधिकाºयांनी पकडला. त्यांनी आरोपींना अटकही केली. याची माहिती महाराष्ट्र वन अधिकाºयांना दिली. मध्य प्रदेशातील कुकरू-खामला रेस्ट हाऊसवर पार पडलेल्या दोन्ही राज्यांतील समन्वय बैठकीत यावर चर्चाही झाली.पूर्व मेळघाट वनविभागाच्या डीएफओ पीयूषा जगताप प्रसूती रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार अविनाशकुमार यांच्याकडे आहे. काही दिवस एसीएफ सानप यांच्याकडेही डीएफओंचा प्रभार होता. प्रादेशिक वनविभागाला चार महिन्यांपासून नियमित डीएफओ नाहीत. मिणा गेल्यानंतर मोबाइल डीएफओ हरिश्चंद्र वाघमोडे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार होता. आता वर्किंग प्लॅनचे डीएफओ संजय दहिवले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.व्याघ्र प्रकल्पातही वृक्षतोडमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या वनक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आहे. सिपना वन्यजीव विभागाच्या पाचडोंगरी, कोयलारी, कन्हेरी, घाना बीटमधील वृक्षतोड नजरेत भरण्यासारखी आहे. उल्लेखनीय ठरली आहे. प्रादेशिक वनविभागाच्या सीमेलगत व्याघ्र प्रकल्पांतर्गत वृक्षतोड असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला अतिक्रमणाने ग्रासले आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे.४० किलोमीटरची सीमावृक्षतोडीनंतर लाकूड वाहून नेण्यासाठी बैलांचा उपयोग घेतला जातो. ससोदा, बºहाणपूर, बानूर, धोत्रा, पाटोली, जांम्बुलडी, आडऊंबर, जनुना, पाळा, धाबा, खुमई, लामघाटी, पलासखेडी, बामादेही, निंभोरा या मध्यप्रदेशतील गावालगतच्या जंगलातून सागवान वृक्षांची अवैध कत्तल होत आहे. यातील आडउंबर, जाम्बुलडी, पाटोली जंगलात वृक्षतोडीची भयानकता अधिक आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश मधील जवळपास ३० ते ४० किलोमीटरची सीमा यात गुंतली आहे.हेडलोडमध्यप्रदेश जंगलासह मेळघाट वनविभागांतर्गत पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट सीमेलगत मोठी अवैध वृक्षतोड आहे. हे सर्व लाकूड हेडलोडने म्हणजेच डोक्यावरून सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी गावालगत गोळा केले जात आहे. मध्य प्रदेशातील लाकूड महाराष्टÑात गोळा करून वनतस्कर आंध्र प्रदेशात पाठवितात.

टॅग्स :forest departmentवनविभाग