सोलापूर येथे ३४ व्या पक्षिमित्र संमेलनात होणार प्रदान, होप संघटनेचा उपक्रम
अमरावती : ठाणे येथील हियर ऑन प्रोजेक्ट एनव्हार्नमेंट (होप) या संस्थेकडून महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात दरवर्षी दोन पुरस्कार दिले जातात. त्यानुसार उद्योन्मुख पक्षिनिरीक्षक पुरस्कार सातारा जिल्ह्यातील किरकसाल येथील चिन्मय सावंत, तर उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कार, सोलापूर येथील राहुल वंजारी व भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील मृणाली राऊत यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
“उद्योन्मुख पक्षिनिरीक्षक” व “उद्योन्मुख पक्षिमित्र” या पुरस्कारांसाठी प्रत्येकी २५०० रुपये व प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे होणार असून, या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेचे अध्यक्ष जयंत वडतकर यांनी दिली.
००००००००००००००००००००००००००००