अकोला: प्रत्येक माणसाच्या मनात विचारांचे वारू ळ निर्माण होत असते. नैतिक आणि अनैतिक दोन्ही विचारांचे चक्र मनात घोंघावत असतात. नैतिकतेवर अनैतिकता कशी हावी होते, याचा झगडा म्हणजे ‘वारू ळ’. नैतिकता आणि अनैतिकतेचे प्रतीक म्हणून मुंग्यांचे वारू ळ असते. मुंग्यांनी तयार केलेल्या वारुळात नाग जेव्हा कब्जा करतो, तेव्हा त्या मुंग्यांना आपले वारू ळ सोडावे लागते, तसेच माणसाच्या मनातील चांगल्या विचारांवर जेव्हा वाईट विचारांचे साम्राज्य पसरते, तेव्हा चांगला माणूस वाईट मार्गावर लागतो. वारू ळ या नाटकांमध्ये दोन चांगल्या विचारांची माणसे वाईट विचाराच्या माणसावर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करीत असतात, हेच वारू ळ या नाटकातून कलाकारांनी उत्तमपणे मांडले.५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत शनिवारी कलारसिक शिक्षण व सांस्कृतिक बहूद्देशीय संस्था बुलडाणाच्यावतीने वारू ळ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास वीस वर्षांनंतर डॉ. सुनील गजरे आणि गीता जोशी यांनी ‘कमबॅक’ केले. एवढे वर्ष डॉ. गजरे यांच्या अभिनयाला नाट्य रसिक मुकलेली होती. या नाटकातून डॉ. गजरे यांनी रंगभूमीवर कमबॅक केल्याने रसिकांना सर्वोत्तम अभिनय पाहण्याची संधी मिळाली. या नाटकात मुंग्यांची भूमिका उमेश जाधव यांनी केली. राणीचे पात्र गीता जोशी यांनी उत्तम वठविले. डॉ. सुनील गजरे यांनी यामध्ये डॉ. काल्याची भूमिका रंगविली. राजेंद्र पोळ यांचे दर्जेदार लिखाण आणि उमेश जाधव यांचे दमदार दिग्दर्शन नाटकाला लाभले. यातील तिन्ही कलाकार दिग्गज असल्याने नाटक अतिशय सुंदर झाले. विशालचे संगीतही चांगले होते. प्रकाश योजना अनिल कुळकर्णी यांची होती. भूषण झडपे आणि सचिन दलाल यांनी नाटकाला साजेशे नेपथ्य दिले.यामधील पात्र मुंग्या आणि राणी परिस्थितीने गांजलेली असूनही नैतिकतेची साथ दोघेही कधीच सोडत नाही. त्याउलट काल्या हा परिस्थितीने चांगला असूनही अनैतिक त्याच्यावर हावी झालेली असते. पहिले वारू ळ अस्तित्वात असताना जेव्हा दुसरे वारू ळ तयार होत असते, तेव्हा पहिल्या वारुळाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असतो. शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवण्यात वारू ळ नाटकातील कलाकारांनी यश मिळविले.