चांदूर रेल्वे : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिले प्राधान्य हे महाविकास आघाडीसाठीच राहणार आहे, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी व्यक्त केले. ते चांदूर रेल्वे येथे निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्याकरिता शुक्रवारी दुपारी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जर सन्मानजनक तडजोड झाली नाही तर स्थानिक नेतृत्वासोबत बोलून वेगळे लढण्याचा निर्णय घेऊ व महाविकास आघाडीमधील पक्षांचे मतभेद असू शकते. पण, मनभेद असणार नाही, असेही मेहबुब शेख म्हणाले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या धोरणानुसार जास्तीत जास्त युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी मिळावी. त्यानुषंगाने आमच्या कार्यकारिणीतील किती युवक काँग्रेसचे पदाधिकारी महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक आहे, याची चाचपणी केली. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा पक्ष व्हावा, या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढील काळात बुथ कमेटीपर्यंत संघटन करणार आहे, असेही महेबूब शेख यांनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख चांदूर रेल्वे शहरात दुपारी भेट दिली. यावेळी जुना मोटार स्टँड येथे त्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्थानिक विश्रामगृह येथे शहर व तालुका पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी आढावा घेतला. यावेळी रा.काँ. प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेश उपाध्यक्ष निखिल ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुशील गावंडे, प्रदेश सरचिटणीस विनय कडू, करण ढेकळे, अरुण अजबे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज पठाण, विपीन शिंगणे आदींची उपस्थिती होती. शहराध्यक्ष अंकित गाढवे व तालुकाध्यक्ष आदेश राजनेकर यांच्याकडून प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला. नगरपरिषद, जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे संघटन बुथ कमिटीपर्यंत झाले पाहिजे, शहराची रचना नगरपालिकेच्या प्रभाग, वार्ड अध्यक्ष, बुथ अध्यक्षापर्यंत असावी, या संदर्भात सूचना दिल्या. प्रदेश सरचिटणीस विनय कडू यांच्या हस्ते मेहबुब शेख व रविकांत वरपे यांचा शाल व गणपतींची प्रतिमा देऊन सत्कार केला. बैठकीला माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष समीर जानवानी, पप्पू भालेराव, संदीप देशमुख, नुरूलहसन कुरैशी, खुदाबक्श कुरैशी, अमोल दुधाट, अमोल देशमुख, युवक शहराध्यक्ष अंकित गाढवे, आदेश राजनेकर, उदय कोरडे, मनोज चुडे आदींची उपस्थिती होती.
100921\4821img-20210910-wa0108.jpg
photo