अमरावतीकरांमध्ये संताप : २४ तासानंतरही वीजपुरवठा खंडितच लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवारी कोसळलेल्या मान्सूनपुर्व वादळी पावसाने महापालिकेसह महावितरणची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. तोंडावर येऊन ठेपलेल्या पावसाळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरण सज्ज असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने महावितरणची पोलखोल केली आहे. काँग्रेसनगर, अर्जुननगर आणि पोटे इस्टेटमधील लाखो नागरिक अद्यापही अंधारात आहेत. २४ तासानंतरही याभागातील वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. शनिवारी दुपारी व सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. सुमारे दोन तास मुसळधार कोसळलेल्या अवकाळी पावसाने ाारांबळ उडाली. काही भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. मात्र, २४ तास उलटूनही काँग्रेसनगर, अर्जुननगर आणि पोटे इस्टेटमधील वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही. महावितरणने जाहीर केलेले मोबाईल क्रमांक ‘नॉट रिचेबल’ असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. ोठ्या अधिकाऱ्यांनी असहकार पुकारल्याने विचारणा करायची तरी कुणाला, असा सवाल मनपा विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनगरसह परिसरातील शेकडो नागरिकांनी शेखावत यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यानंतर त्यांनी महावितरणशी संपर्क साधला असता कुठल्याच अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही, असे शेखावत यांनी स्पष्ट केले.उपाययोजना कागदावरचझाडे किंवा मोठ्या फांद्या वादळी व मुसळधार पावसाने वीज वाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन कटाई करणे अपेक्षित आहे. मात्र, आवश्यक त्या उपाययोजना न राबविल्याने शहरातील वीजपुरवठा वृत्त लिहेस्तोवर पूर्ववत झाला नव्हता. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.वीजतारांवर, खांबांवर झाडे पडल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत. अर्जुनगर,पोटे इस्टेट आणि काँग्रेसनगर भागातील वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही.-फुलसिंग राठोडजनसंपर्क अधिकारी ,महावितरण
महावितरण ‘नॉट रिचेबल’ !
By admin | Published: May 29, 2017 12:03 AM