अमरावती : लोकसभा मतदारसंघाच्या १९ व्या खासदार कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर म्हणजेच बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे सर्व उमेदवारांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. पहिल्या फेरीच्या निकालानंतर मतदारसंघाचा कौल कुणाला? यामध्ये चढ-उतार राहिला. सुरूवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये महायुतीला आघाडी होती. सहाव्या फेरीनंतर महाआघाडीने आघाडी घेतली. काही वेळाने अभिजित अडसूळ हे मिडिया कक्षात आले. मात्र नंतरच्या फेºयातही आघाडी वाढू लागल्याचे स्पष्ट होताच अडसूळ हे निघून गेलेत. दर तासांनी या केंद्रावरील कल बदलत राहिल्याने उत्सुकता वाढत गेली.पहिल्या फेरीनंतर...सकाळी ८ वाजता टपाली व ईटीपीबीएस (सर्व्हिस होटर्स) मतमोजणीला सुरूवात झाली. यामध्ये महायुतीचे उमेदवार महाआघाडीच्या नवनीत राणा यांच्यापेक्षा एक हजार मतांनी आघाडीवर होते. पहिल्या १५ मिनिटांतील या निकालानंतर अमरावती मतदारसंघातील निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी मतमोजणीसाठी आलेले सर्व प्रतिनिधींच्या चेहºयावरचे भाव बदलले. काही पदाधिकाऱ्यांनी मीडिया कक्षात येऊन ठाण मांडला. क्षणाक्षणाला बदलणाºया सुविधा अॅपच्या माहितीच्या आधारे 'अपडेट' आदान-प्रदान होऊ लागले.दुसºया फेरीनंतर...निवडणूक विभागाद्वारा फेरी जाहीर करायला वेळ लागत असल्याने सुविधा पोर्टलवरून माहिती जाणून घेण्याकडे सर्वांचा कल दिसून आला. आनंदराव अडसूळ व नवनीत राणा यांच्यातील मतांचे अंतर कमी होत असल्याने महाआघाडीच्या गोटात उत्साह वाढला. अचलपूर व दर्यापुरात महायुती तर अमरावती, बडनेरा, तिवसा व मेळघाट मतदारसंघात महाआघाडीने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांच्या मेळघाटात राणा यांनी अडीच हजारांवर आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट झाले.पाचव्या फेरीनंतर...पाचव्या फेरीअखेर अडसूळ समोर असले तरी सुविधा पोर्टलवर नवनीत राणा यांना नऊ हजारांवर मतांची आघाडी घेतल्याने राणांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला. मतमोजणी केंद्राबाहेरही गर्दीचा ओघ वाढला. मीडिया कक्षात ट्रेंड जाणून घ्यायला अनेकांनी धाव घेतली. मतमोजणीत उन्हसावलीचा खेळ हा उपस्थित पदाधिकाºयांच्या चेहºयावर स्पष्ट जाणवत होता.दहाव्या फेरीनंतर...अकराव्या फेरीला सुरूवात होताच महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांची आघाडी सातत्याने कायम राहिली. त्यामुळे महाआघाडीचे समर्थकांमध्ये उत्साह वाढला. महायुतीचे कार्यकर्ते हे पुढच्या फेरीत आपण कव्हर करणार याविषयी एकमेकांना धीर देऊ लागले. मतमोजणी केंद्राचे आसपास त्यांच्या चर्चा सुरू झाल्यात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा मतमोजणी केंद्रावर येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये नवा उत्साह संचारला. पाच मतदारसंघाची आघाडी आता कायम राहणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र फेरी जाहीर व्हायला वेळ लागत असल्याने कार्यकर्त्यांच्या चेहºयावर ताण दिसून येत होता.शेवटच्या फेरीनंतर...अठरावी फेरी आटोपताच मतमोजणी केंद्रात फक्त महाआघाडीचे व युवा स्वाभिमानचे प्रतिनिधी थांबल्याचे दिसूल आले. सर्वांना उत्सूकता अंतिम निकालाची, आरओद्वारा टपाली मतांसह केव्हा निकाल जाहीर करतात, याविषयीची विचारणा सातत्याने होताना दिसत होती. याहीपेक्षा विजयी उमेदवार नवनीत राणा यांच्या समवेत विजयाचा जल्लोष करण्यासाठी सर्व आतूर झाल्याचे चित्र मतमोजणी केंद्राच्या आत व बाहेर पाहायला मिळाले. प्रमाणपत्र मिळायला उशीर होणार असल्याने मतमोजणी केंद्राबाहेरदेखील मोठ्या प्रमाणात राणा यांच्या चाहत्यांची गर्दी जमली. महाआघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यंासह पदाधिकारीदेखील या ठिकाणी जमलेत. विजयी उमेदवार थोड्या वेळांनी येणार असल्याचा संदेश या ठिकाणी फिरू लागला. मतमोजणी केंद्रावर उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाºयांचे मोजणीचे काम आटोपल्यामुळे ते देखील विजयी उमेदवारास मुख्य निरीक्षक व आरओंच्या हस्ते प्रमाणपत्र आल्यानंतर या ठिकाणाहून घरी जायला मिळते याच धारणेत दिसून आले.मतमोजणीच्या पाच फेºयांत महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ आघाडीवर राहिलेत. मात्र, त्यानंतर महाआघाडीच्या नवनीत राणा यांनी आघाडी खेचली, ती शेवटपर्यंत कायम टिकविली. त्यामुळे मतांच्या चढ-उतारामध्ये दोन्ही गटाच्या उपस्थितांमध्ये प्रत्येक फेरीत उत्सुकता दिसून आली.
पाचव्या फेरीपर्यंत महायुती खूष, सहाव्यानंतर महाआघाडीचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:50 AM
लोकसभा मतदारसंघाच्या १९ व्या खासदार कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर म्हणजेच बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे सर्व उमेदवारांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. पहिल्या फेरीच्या निकालानंतर मतदारसंघाचा कौल कुणाला? यामध्ये चढ-उतार राहिला. सुरूवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये महायुतीला आघाडी होती.
ठळक मुद्देअन् अभिजित अडसूळ गेले निघून