ग्रामपंचायत निवडणूक : ४ एप्रिलला आरक्षण सोडत, गावपुढाऱ्यांचा हिरमोडअमरावती : जिल्ह्यात एप्रिल २०१५ ते मार्च २०२० दरम्यान मुदत संपणाऱ्या ७२७ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ एप्रिल रोजी काढण्याची शक्यता आहे. यामध्ये ३७० ग्रामपंचायत सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. याव्यतिरीक्त ३५७ खुल्या प्रवर्गात देखील महिलांना संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बहुतांश गावात महिला राज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण घोषित न झाल्याने सरपंच पदासाठी ईच्छुक गावपुढाऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. जिल्ह्यात सध्या निवडणूक असणाऱ्या मार्च २०२० दरम्यान कालावधी संपणाऱ्या ७२७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्हास्तरावर एप्रिल रोजी काढण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्या निवडणूक असणाऱ्या ५५२ व मार्च २०२० कालावधीपर्यंत मुदत संपणाऱ्या १७५ ग्रामपंचायतीसाठी ही सोडत आहे. यामध्ये ३७० ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जाती साठी ७०, अनुसूचित जमातीसाठी ३०, ईतर मागासवर्गीयांसाठी १०० व सर्वसामान्य प्रवर्गासाठी १०० सरपंच पदाची महिलासाठी राखीव राहणार आहे. या व्यतिरीक्त सर्वसामान्य प्रवर्गात १६० सरपंच पदे महिलांसाठी आरक्षीत, सर्वसामान्यांसाठी राखीव असणाऱ्या १५३ सरपंचामध्ये देखील काही ग्रामपंचायतमध्ये महिलांची सरपंच पदासाठी वर्णी लागू शकते. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतीच्या अर्ध्यापेक्षा जास्त पदावर महिला विराजमान होत असल्याने बहुतांश गावामधील विकासाची सूत्रे महिलांकडे जावून गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)आरक्षण सोडतीने बदलणार समीकरणेशासनाने तीन वर्षांपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत व या निर्णयानंतर प्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहे. तब्बल ३७० महिलांना गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. यामध्ये राजकीय दृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचातींचा समावेश आहे. या गावाचे सरपंच होण्यास सर्वच इच्छूक असतात. मात्र आरक्षण सोडतीमुळे अनेकांची समीकरणे बदलणार आहे. त्यामुळे महिला आरक्षण सोडतीकडे ईच्छूकांचे लक्ष लागले आहे. गावपुढाऱ्यांना प्रतीक्षाग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच बनण्याचे डोहाळे गावपुढाऱ्यांना लागले आहे. निवडणूक जाहीर झाली. परंतु सरपंच पद आरक्षण जाहीर झाले नसल्याने इच्छूकाना प्रतीक्षा करावी लागत आहे. ऐनवेळी जर सरपंच महिला राखीव झाले तर त्या प्रवर्गातील महिला शोधून कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.अन्य आरक्षण सोडत तालुकास्तरावरजिल्ह्यातील सर्व ७२७ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महिला आरक्षण विषयक सोडत जिल्ह्यात होत आहे. साधारणपणे ३७० ग्रामपंचातीसाठी सरपंचपद हे महिलांसाठी आरक्षीत राहणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आदी आरक्षणाची सोडतही तालुकास्तरावर काढण्यात येणार आहे.
३७० ग्रा.पं.मध्ये ‘महिलाराज’
By admin | Published: March 28, 2015 12:07 AM