लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक महिला दिनाच्या पर्वावर शुक्रवारी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सातपोलीस ठाण्यांची धुरा सांभाळून ठाणेदाराची भूमिका बजावली. त्यामुळे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एक दिवस 'महिला राज' असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. ठाण्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षकांनी स्वागत केल्याने हा दिवस एक आगळावेगळा ठरला आहे.शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याची धुरा पोलीस उपनिरीक्षक आर.जे.चंदापूरे यांनी सांभाळली. त्याचप्रमाणे बडनेरा ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक ममता अफुने, नागपुरी गेट ठाण्यात सुनीता राऊत, कोतवाली ठाण्यात प्राजक्ता घावडे, फ्रेजरपुरा ठाण्यात शुभांगी थोरात, खोलापुरी गेट ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक सोनू झामरे व राजापेठमध्ये पोलीस उपनिरीक्षक निमजे यांनी ठाण्यात महिला दिनानिमित्त ठाणेदारचा अनुभव घेतला. दररोज ठाणेदार आपआपले कर्तव्य बजावताना दिवसाभरातील गुन्ह्याविषयक घडामोडीवर निर्णय घेत संबंधित पोलीस कर्मचाºयांकडून कामे करून घेतात. तीच कामे महिला दिनी महिला पोलीस अधिकाºयांकडे सोपविण्यात आल्याने, त्यांनाही एक आगळावेगळा अनुभव घेता आला.
पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस ठाण्यात महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:15 PM