लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ‘माहोल हमने बिगाडा, हमारे लोगोने बिगाडा’ अशी कबुली देणारा व्हिडीओ जुळ्या शहरात व्हायरल झाला आहे. यातील तो धमकावणारा कोण, तो पाच दिवसानंतरही मोकाट कसा, त्याच्या अन्य पसार साथीदारांची माहिती त्याच्याकडून का घेतली जात नाही, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. व्हिडीओमधील कबुली धक्कादायक मानली जात आहे.मंगळवारी रात्री ९.३० वाजता परतवाडा शहरात जुन्या वैमनस्यातून सल्लू ऊर्फ सलमान सय्यद रहमान याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दीपक ऊर्फ झांशी शंकर कुंबलेले याला अटक केली. घटनेतील त्याचे दोन साथीदार लल्ला ठाकूर व पवन दोघेही पसार आहेत. पोलिसांना पाच दिवसानंतरही त्यांना अटक करण्यात यश आले नाही. हत्येतील आरोपी व मृत एकेकाळचे जीवलग मित्र होते. अंतर्गत बाबीमुळे दोघांतील कटुतेचे पर्यावसान हत्याप्रकरणात झाला. या प्रकरणाशी शहरातील व्यापारी तसेच प्रतिष्ठानांवर दगडफेक करून लुटमार व चाकुहल्ला करणाऱ्यांचा संबंध नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तो सुनियोजित कट असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या संदर्भाने बोलले जात आहे. व्यापारी प्रतिष्ठानांवर हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा व्हिडीओ जुन्या शहरात व्हायरल होत आहे. पोलिसांनी सत्यता तपासून आरोपीला जेरबंद करण्याची मागणी व्यापाºयांनी केली आहे.नांगी ठेचणार का ?प्रतिष्ठानांवर बुधवारी सकाळी १० वाजता अचानक दगडफेक होताच सर्वत्र खळबळ उडाली होती. मोठा जमाव त्या ठिकाणी एकत्र आला. व्यापारी व उपस्थितांमध्ये तू-तू-मैं-मैं झाली. एका व्यापारी नेत्याने ‘माहोल किसने बिगाडा?’ असा थेट प्रश्न करताच, ‘हमने बिगाडे, हमारे लोगों ने बिगाडे!’ अशी सार्वजनिक कबुली देणारा आवाज त्या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. थेट कबुली देणाºयास पकडून पोलीस त्याची नांगी ठेचणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत?दगडफेक व चाकुहल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा व्यापारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. हल्लेखोर ५० ते ६० च्या संख्येने होते. त्यांच्यापैकी पाच दिवसांत सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांचा संथ गतीचा तपास पाहता, व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. पोलिसांकडून सुरक्षिततेची हमी असताना, आरोपींना अटक करण्यात होत असलेली दिरंगाई व्यापाºयांमध्ये संताप व्यक्त करणारी ठरली आहे.
माहोल हमने बिगाडा, हमारे लोगों ने बिगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:59 AM
‘माहोल हमने बिगाडा, हमारे लोगोने बिगाडा’ अशी कबुली देणारा व्हिडीओ जुळ्या शहरात व्हायरल झाला आहे. यातील तो धमकावणारा कोण, तो पाच दिवसानंतरही मोकाट कसा, त्याच्या अन्य पसार साथीदारांची माहिती त्याच्याकडून का घेतली जात नाही, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ठळक मुद्देव्हिडीओ व्हायरल : पोलिसांपुढे सार्वजनिक कबुली; आरोपी मोकाटच