शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अमरावतीकडे जाणाºया मुख्य मार्गाची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:21 PM

अमरावतीकडे जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ता नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपुलापर्यंत छन्नी-छन्नी झाला आहे. पक्का रस्ता होईल तेव्हा होईल. कमीत कमी डागडुजी तरी करा, ....

ठळक मुद्देसंतप्त सवाल : पक्का रस्ता वाट्टेल तेव्हा करा, डागडुजी तरी करा

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावतीकडे जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ता नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपुलापर्यंत छन्नी-छन्नी झाला आहे. पक्का रस्ता होईल तेव्हा होईल. कमीत कमी डागडुजी तरी करा, अशा संतप्त प्रतिक्रिया येथून नियमित जाणाºया वाहन चालकांमध्ये आहे.जुन्या वस्तीपासून ते नरखेड रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. दोन किलोमीटरच्या या खराब रस्त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. बडनेºयाहून नियमित नोकरी कामधंद्यासाठी जाणाºया वाहनचालकांना याचा केवळ मन:स्ताप होत नसून शारीरिक दुखापतीचाही त्रास झाल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित प्रशासनाने या खराब रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी. ज्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळेल.बडनेºयातील या भागात पक्का रस्ता होणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून ऐकीवात आहे. मात्र जेव्हा पक्का रस्ता करायचा तेव्हा तो करा, आता मात्र चाळणी झालेल्या रस्त्याची डागडुजी तरी करा, असे संतप्तपणे बोलल्या जात आहे. चाळणी झालेल्या रस्त्याच्या कडेला बारीक गिट्टीचा थर साचला आहे. रात्रीच्या वेळेस अपुºया प्रकाश व्यवस्थेमुळे याठिकाणी वाहनचालक घसरून पडत आहे.खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित प्रशासनाने याची तत्काळ दखल घेण्याची गरज आहे. अमरावती ते बडनेरा मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. खराब रस्ता चुकवित वाहन चालकांना आपला जीव मुठीत ठेवून हा रस्ता पार करावा लागतो आहे. प्रचंड दैनावस्था झालेल्या दोन किमीच्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीनेही लक्ष द्यावे, असेही वाहन चालकांसह बडनेरा वासीयांमध्ये बोलले जात आहे.मणक्याच्या आजाराने वाहनचालक त्रस्तनरखेड क्रॉसिंगजवळ पुलाच्या कामाला तब्बल पाच वर्ष लागले. त्या भागातला रस्ता देखिल खराब होता. तो त्रास कमी झाला असला तरी जुनीवस्ती ते नरखेड क्रॉसिंग उडाणपुलापर्यंतच्या खराब रस्त्यामुळे नियमित या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना मणक्याचे तसेच पाठीच्या दुखण्याचे आजार वाढत असल्याचे प्रकर्षाने बोलल्या जात आहे.