शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

‘त्या’ जलवाहिनीसाठी निधी उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2017 12:12 AM

नगरपंचायत क्षेत्रातील आनंदवाडी, अशोकनगरसह पाच वॉर्डांमध्ये आठ किमी अंतरावरील सातरगाव येथून पाणीपुरवठा करण्यात येतो.

यशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचा पाठपुरावातिवसा : नगरपंचायत क्षेत्रातील आनंदवाडी, अशोकनगरसह पाच वॉर्डांमध्ये आठ किमी अंतरावरील सातरगाव येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र ही जलवाहिनी जीर्ण झालेली असल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होतो. याविषयीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यावर निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांकडे केली.यासह विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.येथील जिल्हाधिकाऱ्यांना वहिवाटीचे अनेक रस्ते, विहिरींची कामे, खचलेल्या विहिरींची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. हा निधी पंचायत समिती व तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. नगरपंचायतीने शासन निर्णयान्वये कामे करण्याचा ठराव घेतला आहे. तसेच जॉब कार्डदेखील वितरित केले आहे. मात्र, ही कामे अद्याप प्रलंबित होती. ग्रामविकास व नगरविकास विभागातील संभ्रम दूर करून कामे मार्गी लावावी, अशी मागणी आ. ठाकूर यांनी केली. येथील नागरी दलित वस्ती सुधारणेसाठी नगरपंचायतीद्वारा प्रस्ताव पाठविण्यात आला. या कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (प्रतिनिधी)पीएम आवास योजना, ओबीसींना घरकूल द्यानगरपंचायत क्षेत्रातील १६५ ओबीसी लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.