पान १ वर
अमरावती : दोन अज्ञातांनी हाताला हिसका देऊन आपल्याकडील तीन लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार एका वृद्धेने बडनेरा पोलिसांत नोंदविली होती. ती तक्रार खोटी असून, तक्रारकर्त्या महिलेने बनाव रचल्याची माहिती ठाणेदार पंजाब वंजारी यांनी माध्यमांना दिली आहे. खोटी तक्रार देणाऱ्या त्या महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. ६ सप्टेंबर रोजी त्या महिलेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. बेनाम चौक ते अकोली रोडने जात असताना एका ट्रेडर्सजवळ दोन अज्ञात चोर बॅग घेऊन पळाले, असा बनाव त्या महिलेने रचला. बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तेथील सीसीटीव्हीने त्या वृद्धेचे बिंग फोडले. फुटेजची पाहणी केली असता, त्या वृद्धेजवळ हातात कुठलीही पिशवी आढळून आली नाही.
बॉक्स
घरगुती कारणामुळे रचले कुंभाड
दर्यापूर तालुक्यातील एका गावची रहिवासी असलेल्या त्या महिलेने बुधवारी बनाव केल्याची कबुली दिली. घरगुती कारणामुळे आपण वाटमारीचे कुंभाड रचल्याचे तिने बडनेरा पोलिसांना सांगितले.
///////////
खोटी तक्रार हा गुन्हा
पोलिसांकडे खोटी तक्रार करणे हा गुन्हा आहे. गुन्हा दाखल करताना खोटी, अवास्तव माहिती देणे, पोलिसांची दिशाभूल करणे हा भारतीय दंड संहितेनुसार अपराध ठरतो. आयपीसी १८६० च्या कलम १८२ नुसार जी व्यक्ती सरकारी कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक खोटी माहिती देईल, त्याला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा एक हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कलम २११ नुसारही अशा व्यक्तींवर कारवाई होऊ शकते, ज्यात सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
/////////////
कोट
ती घटना घडलीच नाही. जनतेने अशा खोट्या तक्रारी देऊ नयेत. अशांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येते. त्यात दोन ते सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
पंजाब वंजारी, ठाणेदार, बडनेरा
/////////////