आॅनलाईन लोकमतअमरावती/दर्यापूर : मामीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिच्याशिवाय जगायचे नाही, या इराद्याने भाच्याने मामाचा गेम केला. मात्र, मामीसोबत लग्नाचे स्वप्न भंगल्याने आरोपी भाचा अल्ताफ शाह याने दर्यापूर पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. अल्ताफने खुनाची कबुली दिली तरी मृतदेह सापडला नसल्याने गुन्हा सिद्ध कसा करावा, असा पेच पोलिसांपुढे आहे.मृत शेख शारीफ शेख लतीफ याची पत्नी फरजाना परवीन व भाचा अल्ताफ शाह साबीर शाह यांच्यात इंदूर येथे राहत असताना प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. तिघांचा उदरनिर्वाह होत नसल्याने अल्ताफने परतीचा मार्ग स्वीकारला. त्याच्यापाठोपाठ फरजानाही निघाली. शारीफ तेथेच राहील, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, तोही माहुली येथे परतण्यासाठी सज्ज झाला. प्रेमात अडसर ठरणाºया पतीचा काटा काढण्यासाठी फरजानाने अल्ताफच्या साथीने खुनाचा कट रचला. त्यानुसार अल्ताफने तीन साथीदारांसोबत मामाचा गेम केला.अकोट-पोपटखेड मार्गावरील बंद हड्डी कारखान्याजवळील २० ते ३० फुटाच्या खड्ड्यात मृतदेह फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. मात्र, त्याचा मृतदेह सापडला नाही. जेसीबीने खोदकाम करूनही हाती काहीच लागले नसल्याने खून सिद्ध करणे कठीण झाले आहे.घटनास्थळ दूर का?दर्यापूर पोलिसांना मृतक शेख शारीक शेख लतीफचा अजूनपर्यंत मृतदेह मिळाला नाही. मृताची विल्हेवाट लावण्यासाठी या पाचही आरोपींनी ७५ किलोमीटर अंतरावरील स्थळ का निवडले, हेदेखील तपासात स्पष्ट होईल.खुनासाठी मामीने दिले पैसेशेख शारीफ शेख लतीफ याचा खून करण्यासाठी पत्नी फरजाना परवीन शारीफ शाह हिने ३० ते ४० हजार रुपये दिले. शारीफ हा १३ आॅगस्ट २०१७ रोजी बेपत्ता झाला. तशी तक्रार १४ आॅगस्टला करण्यात आली. पाच महिन्यानंतर १२ जानेवारीला भाचा अल्ताफने स्वत: पोलीस ठाणे गाठून खून केल्याचे सांगितले.आरोपींना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. हत्येसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी पाचही आरोपींची चौकशी सुरू आहे. मृतदेह मिळालेला नाही. यासाठी घटनास्थळावर आम्ही कसून शोध घेत आहोत.- रीतेश राऊत,तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक, दर्यापूर
मामीसाठी भाच्यानेच केला मामाचा ‘गेम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:56 PM
मामीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिच्याशिवाय जगायचे नाही, या इराद्याने भाच्याने मामाचा गेम केला.
ठळक मुद्देलग्न करण्याची इच्छा : पाच दिवसांपासून मृतदेहाचा शोध