शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

एमएसईबीत जा, पण फोनवर बोलायचे नाय; वीज बिल थकीतचा फोन अन् ६० हजारांचा फटका

By प्रदीप भाकरे | Published: January 31, 2023 3:31 PM

ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक बळी

अमरावती : सायबर हॅकिंगची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. हॅकर्स रोज नवीन युक्त्या शोधून सर्वसामान्यांना आपल्या फसवणुकीचा बळी बनवत आहेत. अलीकडे हॅकिंगची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अशावेळी ठग लिंक किंवा मेसेजद्वारे खाते रिकामे करत आहेत. असेच काही प्रकार वीज बिल भरा अन्यथा वीज कापली जाईल, अशा कॉलमधून होत आहे. अचलपूर येथील एका वीजग्राहकाची अशीच सुमारे ६० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी वीजग्राहक शैलेंद्र मिश्रा (६४, नरसाळा, अचलपूर) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी ३० जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. २९ जानेवारी रोजी मिश्रा यांच्या खात्यातून एकूण ५९ हजार ९९७ रुपये परस्पर डेबिट झाले. रविवारी दुपारी मिश्रा यांना एका क्रमांकाहून फोन कॉल आला. एमएसईबी कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करून वीजबिल बाकी आहे. बिलाची रक्कम रात्री ९.३० पर्यंत न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे तो पलीकडून बडबडला. त्या अज्ञात कॉलरने फिर्यादीला बँक खाते क्रमांक व मेल आयडी मागितला. सबब, मिश्रा यांनी त्यांच्या परतवाडास्थित बँकेतील खात्याची डिटेल्स दिली.

आरोपीने त्यानंतर त्यांना क्विक चेक बिल ॲप डाऊनलोड करण्यास सुचविले. ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर आरोपीने पाच अंकी नंबर त्यात ॲड करण्यास सांगितले. तो क्रमांक टाकताच त्यांच्या बँक खात्यातून प्रथम १० हजार व नंतर ४९ हजार ९९९ रुपये कटल्याचा संदेश झळकला. तो फटका बसताच आपली फसवणूक झाल्याचे मिश्रा यांच्या लक्षात आले. ३० जानेवारी रोजी रात्री त्यांनी पोलिस ठाणे गाठले.

..अन् होतो मोबाइल हॅक

चोरट्यांनी पाठविलेली लिंक प्रत्यक्षात वीज बिल वसुलीची नसते. हॅकर्स या लिंकद्वारे मोबाइल हॅक करतात. या लिंकवर क्लिक केल्यावर ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात. काही कळायच्या आत ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रोकड लंपास केली जात असते.

अशी होते फसवणूक

हॅकर्स व्हॉट्सॲप आणि एसएमएसद्वारे लिंक पाठवून ही फसवणूक करतात. यामुळे, यूजर्स लिंकद्वारे हॅकर्सच्या जाळ्यात अडकले जातात आणि आपली रक्कम गमावून बसतात. अनेकदा हॅकर्सच्या माध्यमातून पाठवलेल्या मेसेजमध्ये वीज बिल तत्काळ न भरल्यास वीज तोडण्यात येईल, अशी धमकी देण्यात येत असते. अशा वेळी सर्वसामान्य व्यक्ती घाबरून संबंधित लिंकवर क्लिक करतात आणि पैसे गमावून बसतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीAmravatiअमरावती