शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

मुक्कामादरम्यान जुळविले सूत; ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By प्रदीप भाकरे | Published: May 25, 2023 1:00 PM

लग्नासाठी हेका, आईवडिलांना मारण्याची धमकी

अमरावती : मुक्कामादरम्यान त्याने तिच्याशी प्रेमसूत जुळविले. सात महिन्यांपुर्वी तिला बहाण्याने दुचाकीवर नेऊन ज्युस पाजला. त्या ज्युसमधून त्याने तिला गुंगीचे औषध दिल्याने ती बेशुध्द झाली. तिच्या बेशुध्दावस्थेचा गैरफायदा घेत तिच्यावर एका लॉजमध्ये बलात्कार करण्यात आला. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ मे रोजी ही धक्कादायक घटना उघड झाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी स्वप्निल भुजंगराव रोकडे (३२, ता. अंजनगाव सुर्जी) याच्याविरूद्ध बलात्कार, विनयभंग, शिविगाळ व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. यातील पिडिता ही १७ वर्षांची आहे.

तक्रारीनुसार, एका औषध कंपनीची मीटिंग आटोपून आरोपीने पीडिताच्या घरी मुक्काम केला तेव्हापासून पीडिता व आरोपीमध्ये प्रेम संबंध जुळले. ऑगस्ट २०२२ मध्ये आरोपीने पिडिताला तिच्या आई- वडिलांची तब्येत ठीक नाही, असे सांगून दुचाकीवर नेले. अंजनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जूस सेंटरला थांबून तिला ज्यूस पाजला. त्यात गुंगीचे औषध मिसळल्याने नंतर तिला भोवळ येऊन तिची शुद्ध हरपली. थोड्यावेळाने ती शुध्दीत आली असता आपण लॉजवर आहोत, येथे आरोपीने आपल्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याची जाणीव पिडितेला झाली. घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या आई-बाबांना मारून टाकेल, अशी धमकी त्याने दिल्याचे पिडितेने तक्रारीत म्हटले आहे.

विनयभंग, शिविगाळदेखील

१८ मार्च रोजी आरोपीने पीडितेला सातेगाव फाट्यावर बोलावले. तेथे माझ्याशी लग्न कर नाहीतर आई वडिलांना खतम करतो, अशी धमकी दिली. तिचे केस ओढून विनयभंग केला. ही घटना पीडिताने तिच्या आई- वडिलांना सांगितली. तिच्या आई-वडिलांनी आरोपी स्वप्निलला हरतऱ्हेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र उलटपक्षी आरोपीने पिडितेच्या आई-वडिलांना शिविगाळ केली. त्यामुळे १७ वर्षीय पिडितेने २४ मे रोजी सायंकाळी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

पिडितेच्या तक्रारीवरून बुधवारी रात्री आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

- दीपक वानखडे, ठाणेदार, अंजनगाव सुर्जी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावतीArrestअटक