लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवार, १६ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटींग’ होण्याची दाट शक्यता आहे. पाच जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिव्या वाघमारे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली.व्यवस्थापन परिषद निवडणुकीने आतापर्यंत उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा प्रवास केला आहे. नुटाचे प्रवीण रघुवंशी यांनी विद्यापीठाने चार अधिष्ठातांना मतदानाचा हक्क बहाल केल्याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढली. मात्र, न्यायालयात ते फार काळ टिकू शकले नाही. अखेर न्यायालयाने विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत व्यवस्थापन परिषदेची निवडणूक जाहीर कार्यक्रमानुसार घेण्याची परवानगी दिली. तूर्तास या निवडणुकीत शिक्षण मंचचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, अभाविपने उत्पल टोंगो यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने शिक्षण मंचची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे. शिक्षण मंचने प्रदीप खेडकर, मीनल ठाकरे यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पारकाष्ठा चालविली आहे. शिक्षण मंचद्वारे समूहाने प्रचार सुरू आहे. तर, नुटानेदेखील ही निवडणूक डोक्यावर घेतली आहे. किमान तीन उमेदवार निवडून येतील, अशी रणनीती नुटाने आखली आहे. त्याकरिता क्रॉस मतदानावर भर दिला जात असल्याचे दिसून येते. यापूर्वी सुनील मानकर, प्रफुल्ल गवई हे अविरोध निवडून आले आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने ७१ मतदार संख्या निश्चित केल्याची माहिती कुलसचिव अजय देशमुख यांनी दिली.पाच जागांसाठी अशी होणार लढतप्राचार्य मतदारसंघातून खुल्या जागेसाठी शिक्षण मंचकडून विनोद भोंडे, तर प्राचार्य फोरमचे नीलेश गावंडे व शिक्षक मतदारसंघातून शिक्षण मंचचे प्रदीप खेडकर आणि नुटाचे विवेक देशमुख यांच्यात लढतीचे चित्र आहे. व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघात खुल्या जागेसाठी परमानंद अग्रवाल आणि शिक्षण मंचच्या मीनल भोंडे, तर ओबीसी संवर्गातून शिक्षण मंचचे दीपक धोटे आणि नुटाचे वसंत घुईखेडकर यांच्यात लढत होणार आहे. पदवीधर मतदारसंघातून एका जागेसाठी नुटाचे दिलीप कडू आणि अमोल ठाकरे, अभाविपचे उत्पल टोंगो यांच्यात चुरस वाढली आहे. अभाविपने दोन मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे.
विद्यापीठात व्यवस्थापन परिषद निवडणुकीत चुरस वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:17 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवार, १६ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटींग’ होण्याची दाट शक्यता आहे. पाच जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिव्या वाघमारे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली.
ठळक मुद्देअभाविपतर्फे उत्पल टोंगो यांना उमेदवारी : शिक्षण मंच विरुद्ध नुटा, प्राचार्य फोरम यांच्यात थेट लढत