शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

निवडणूक मानधनावरून ‘मानापमान’

By admin | Published: April 26, 2017 12:16 AM

महापालिकेच्या निवडणूक माधनावरुन दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जुंपली असून मानापमान नाट्य रंगले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील लाथाडी : भूमिकेवर प्रश्नचिन्ह अमरावती : महापालिकेच्या निवडणूक माधनावरुन दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जुंपली असून मानापमान नाट्य रंगले आहे. यानिमित्ताने प्रशासनामध्येही रंगलेली वर्चस्वाची लढाई अधोरेखित झाली आहे. ‘मला देत नसाल तर त्यांनाही देऊ नका’ असा पवित्रा अतिरिक्त आयुक्तांनी घेतल्याने प्रशासनाची मात्र कोंडी झाली आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे आणि उपायुक्त प्रशासन विनायक औगड यांच्यामधील विळ्या भोपळ्याचे सख्य महापालिकेतच नव्हे, तर मंत्रालयातही सर्वश्रृत आहे. त्यामुळे या वर्चस्वाच्या लढाईला ‘सिनियर - ज्युनिअर’ची किनारही लाभली आहे. २१ फेब्रुवारीला अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यात महापालिकेसह विविध आस्थापनेवरील अधिकारी - कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. त्यासाठी त्यांना मानधनही देण्यात आले. याच मालिकेत अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांचे निवडणूक काळातील मानधनाची फाईल निवडणूक विभागाकडून उपायुक्त (प्रशा)कडे पाठविण्यात आली. मात्र सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये अतिरिक्त आयुक्तांचा निवडणुकीच्या कामात कोणताही सहभाग नाही, अशी माझी धारणा आहे, अशी प्रशासकीय टिप्पनी उपायुक्त विनायक औगड यांनी केली. त्यामुळे लेखा विभागाने शेटे यांचे मानधन रोखले ही बाब माहिती पडताच १३ एप्रिलला एक टिपणी लिहून शेटे यांनी ती आयुक्तांपुढे पाठविली. आयुक्तांच्या स्वाक्षरीने निवडणूक कालावधीत आपल्यावर ‘इव्हीएम’ची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती. ती आपण पूर्णपणे पार पाडली. याशिवाय आपण सातही झोनला प्रत्यक्षात भेटी दिल्या. त्यामुळे औगड यांची धारणा चुकीची असल्याचे शेटे यांनी आयुक्तांना कळविले. त्यावर आयुक्तांनी तपासून सादर करण्याचे निर्देश दिलेत. औगड यांनी वैयक्तिक द्वेषातून आपल्याला निवडणुकीचे मानधन अदा करू नये म्हणून जाणीवपूर्वक धारणा व्यक्त केल्याचा आरोप अतिरिक्त आयुक्तांनी केला आहे. इव्हीएमची जबाबदारी सोपविण्यात आल्यासंदर्भात आयुक्तांनी काढलेला आदेशही शेटे यांनी या पत्राला जोडला आहे. (प्रतिनिधी)औगडांचा सहभाग काय ? उपायुक्त विनायक औगड यांच्या टिप्पणीने शेटे यांचे निवडणूक मानधन अदा करण्यात आले नाही. त्या पार्श्वभूमीवर औगड यांनी नोडल आॅफिसर म्हणून निवडणुकीसंदर्भात कोणतीही प्रत्यक्ष कर्तव्ये पार पाडली नाहीत. निवडणूक कामात कोणताही प्रत्यक्ष सहभाग नसतानासुद्धा त्यांना मानधन अदा केल्याचे शेटे यांनी म्हटले आहे. -तर त्यांनाही देऊ नये मानधन आपण इव्हीएमचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याबाबत मानधन अदा करावे, अथवा विनायक औगड यांचे मानधन परत घ्यावे, अशी विनंती शेटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. माझे मानधन देत नसाल तर त्यांचेही देवू नका, अशी भूमिका शेटे यांनी घेतल्याने औगड आणि अतिरिक्त आयुक्तांमधील सख्य अधोरेखित झाले आहे.