शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

वाघानंतर मांडूळ सापांवर संक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 4:26 PM

पाच वर्षांपर्यंत वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी होत असताना आता मांडूळ सापांची तस्करी करणारी टोळीही सक्रिय झाली आहे. देशभरात एका वर्षात २७ साप तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपर्यंत वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी होत असताना आता मांडूळ सापांची तस्करी करणारी टोळीही सक्रिय झाली.देशभरात एका वर्षात २७ साप तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. दक्षिण पूर्व आशियाई व पश्चिमी देशात औषध निर्मितीसाठी भारतीय मांडूळ सापांना कमालीची मागणी वाढली आहे.

गणेश वासनिक

अमरावती - पाच वर्षांपर्यंत वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी होत असताना आता मांडूळ सापांची तस्करी करणारी टोळीही सक्रिय झाली आहे. देशभरात एका वर्षात २७ साप तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. आशियाई देशात मांडूळ प्रजातीच्या सापाला कोटी रूपये मोजले जात असल्याने वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेकडून पोलीस व वनविभागाला दक्षतेच्या सूचना मिळाल्या आहेत.

दुतोंड्या साप म्हणून प्रचलित असलेल्या मांडूळ (सॅन्ड बो) हा साप वन्यजीव कायद्यांतगत सूची ४ मध्ये मोडतो. शेती, जंगल आणि माती या ठिकाणी हा साप सहजतेने आढळतो. परंतु, मध्यंतरी काळी जादूसाठी या सापाची शिकार केली जात होती. वर्षभरापासून दक्षिण पूर्व आशियाई व पश्चिमी देशात औषध निर्मितीसाठी भारतीय मांडूळ सापांना कमालीची मागणी वाढली आहे.

सुमारे चार ते पाच किलो वजनाचा हा साप पडकल्यानंतर चीन, बांगलादेश, भूतानमार्गे तस्करी केली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर देश पातळीवर वन्यजीव संदर्भात कार्यरत दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने देशातील वनविभाग व पोलीस यंत्रणेला मांडूळ साप तस्करी रोखण्यासाठी सतर्क केले आहे. हा साप बिनविषारी असला तरी गेल्या पाच वर्षांपासून त्याची तस्करी होत असल्याने ही सापाची प्रजात संपून जाईल, असे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डाने आदेशित केले आहे. 

देशभरात २७ जणांना अटक

मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी देशभरात २७ जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. यात हरियाणा, महाराष्ट्रातील मुंबई, अमरावती, अकोला तर मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथून आरोपी ताब्यात घेतले आहे. सशस्त्र सीमा बलाच्या जवानांनी अशा सापाची तस्करी करताना बिहारमध्ये काहींना पकडले. याशिवाय केरळमधील कोची, उत्तरप्रदेशातील दुधवा, पंजाबचे रूपनगर येथे या सापाची तस्करी करताना आरोपी ताब्यात घेण्यात आल्याचे वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने पत्राद्वारे कळविले.    उत्तरपूर्व राज्य तस्करीचे केंद्र

मांडूळ प्रजातीच्या सापांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कोटी रूपये मिळत असल्याने देशभरात त्याला मागणी आहे. या सापाला पकडण्यासाठी टोळ्या असून, यात काही सर्पमित्रांनी घुसखोरी केल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ, उत्तरप्रदेश, दिल्ली व मुंबई हे मांडूळ साप तस्करीचे माहेरघर असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा साप विमान अथवा जलमार्गाने भूतान, बांगलादेश मार्गे पोहचविला जातो. सापाची तस्करी करणाऱ्यांना २० ते २५ लाख रूपये मिळतात. उत्तरपूर्व राज्यातून मांडुळ प्रजातीच्या सापाची तस्करी फोफावली आहे.      स्मार्ट पेट्रोलिंग करण्याचे आदेश

दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने मांडूळ सापांची तस्करी रोखण्यासाठी वनविभाग अथवा पोलीस यंत्रणेने व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात स्थानिक साप तस्करांवर पाळत ठेवण्याचा सूचना दिल्या आहेत. स्मार्ट पट्रोलिंगच्या माध्यमातून तस्करांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.   मांडूळ सापांच्या तस्करीसंदर्भात पूर्वीपासून सतर्कता बाळगून आहोत. विभागातील सर्व वनाधिकाऱ्यांना  कारवाई करण्याचे आदेश दिले. मध्यंतरी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरूद्ध वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे.

- प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीsnakeसापPoliceपोलिस