---------------------------------------------------
खाद्यपदार्थ हातागाडीवर सिलिंडर ठेवल्याप्रकरणी कारवाई
अमरावती : नाशत्याच्या हातगाडीवर घरगुती गॅस सिलिंडर लावून मनुष्याच्या जीवितास धोका निर्माण केल्याबदल एका व्यावसायिकाविरुद्ध खोलापुरीगेट पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई अकोली रेल्वे क्रॉसिंगजवळ शनिवारी करण्यात आली. सुभाष हरिचंद्र सूर्यवंशी (४२, रा. खंडेलवालनगर) अशी आरोपीची नावे आहेत.
-------------------------
हातातील पिशवी टाकून दारुविक्रेत्याचे पलायन
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी लक्ष्मीनगरात धाड टाकली असता, अवैध दारुविक्रेता पिशवी टाकून पळून गेल्याची घटना दुपारी १२.१५ वाजता दरम्यान घडली. यात सात नग देशी दारू जप्त गुन्हा नोंदवून आरोपी राहुल रामेश्वर हरणे, नितीन लिलाधर हरणे यांना समजपत्रावर सोडण्यात आले.
------------------------------------------
हातात तलवार घेऊन दहशत पसरविणारा अटकेत
अमरावती : हातात तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या आरोपीला राजापेठ पोलिसांनी बडनेरा मार्गावरील एका हॉटेलनजीक अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. सागर अरुणराव महाजन (२०, रा. चवरेनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४,२५ आर्म ॲक्ट सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदानुसार गुन्हा नोंदविला.
--------------------------------------------------
पवननगरात महिलेचा विनयभंग
अमरावती : महिला आरोपीच्या घरी एलआयसी बाँड मागण्याकरिता आली असता, आरोपीने शिवीगाळ करून साडी पकडून महिलेचा विनयभंग केला. ही घटना पवननगरात शनिवारी घडली. रविस केशवराव गंगासागर व अन्य एका महिलेविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३५४,३५४(अ),३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
------------------------------------------