अमरावती : शहरात पुन्हा चेनस्नॅचर सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, यावेळी एका वृद्ध इसमाच्या गळ्यावर चोरट्यांचा हात गेला. या इसमाने चोरट्याच्या हातावर आरीने वार केला. त्यापूर्वी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकण्यात आले.शनिवारी सकाळी फ्रेन्ड्स कॉलनी परिसरातील सन्मित्र कॉलनीतील रहिवासी कमला छत्रपती देशमुख (७८) शनिवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घराच्या आवारात फुले तोडीत होत्या. दरम्यान, एका दुचाकीवर दोन व्यक्ती त्यांच्याजवळ थांबले. दुचाकीवर समोर बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातलेले होते, तर मागे बसणाऱ्या व्यक्तीने टोपी व तोंडाला रुमाल बांधला होता. देशमुख यांनी त्यांना थांबण्याचे कारण विचारले असता, दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने अचानक त्यांच्या गळ्यावर हात मारून १८ ग्र्रॅ्रमचे मंगळसूत्र हिसकावले आणि दुचाकीने पळ काढला. कमलातार्इंनी आरडाओरड केली, मात्र, मदत मिळण्यापूर्वीच चोरटे भरधाव दुचाकी घेऊन पसार झाले. या घटनेची तक्रार त्यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार दोन अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.सन्मित्र कॉलनीतील घटनेच्या तासभरानंतरच राजापेठ हद्दीतील व्यंकटेश कॉलनीतल सोनसाखळी हिसकाविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शहरात पुन्हा चेनस्नॅचर्स सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. तासभराच्या अंतरावर शहरात दोन घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चेनस्नॅचरचा प्रतिकारव्यंकटेश कॉलनीतील सुधाकर रामचंद्र चौधरी (७६) शनिवारी सकाळी घरासमोरील बगीचाजवळ गवत कापत होते. एक दुचाकी त्यांच्यासमोर थांबली. एकाने हेल्मेट घातले होते, मागच्याने तोंडाला रुमाल बांधला होता. मागे बसलेल्या व्यक्तीने समीप आलेल्या चौधरी यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविण्याचे प्रयत्न सुरू केले. चौधरी यांनी आरी चोराच्या हातावर मारली. त्यांनी सोनसाखळी सोडून पळ काढला. चौधरी यांनी काही अंतरावर पाठलाग केला. भरधाव दुचाकी संताजीनगरकडे गेली.
मंगळसूत्र हिसकले सोनसाखळी चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 9:31 PM
शहरात पुन्हा चेनस्नॅचर सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, यावेळी एका वृद्ध इसमाच्या गळ्यावर चोरट्यांचा हात गेला. या इसमाने चोरट्याच्या हातावर आरीने वार केला. त्यापूर्वी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकण्यात आले.
ठळक मुद्देतासाभरात दोन घटना : सन्मित्र, व्यंकटेश कॉलनीतील घटना