लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या कर्मचाºयांची उपस्थिती अद्याप हजेरी पत्रकावर नोंदविली जात असल्याने बायोमेट्रिक पद्धतीला हरताळ फासला आहे. कर्मचाºयांची हजेरी, त्यांचे वेतन व भत्त्यांची मोजदाद अजूनही ‘मॅन्युअल’ पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे पुन्हा याबाबतचे आदेश काढले जाण्याचे संकेत आहेत.‘मॅन्युअल’ पद्धतीने वेतनाच्या नोंदी घेतली जात असल्याने चुकीचे वेतन निघत असल्याची कर्मचाºयांची ओरड आहे. महापालिकेत सन २०१४ पासून बायोमेट्रिक मशिन लावण्यात आल्यात. तूर्तास महापालिकेच्या १३ विभागात २६ बायोमेट्रिक मशिन आहेत. यात स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कामगार वगळता महापालिकेच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी समाविष्ट आहेत. यात सर्वांची हजेरी-गैरहजेरी नोंदविली जाते. सामान्य प्रशासन विभाग आणि लेखा विभागावरील कामाचा भार कमी करण्यासाठी बायोमेट्रिक मशिनमध्ये संकलित डाटाच्या माध्यमातून सर्व कर्मचाºयांचे वेतन होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत हे काम फत्ते झालेले नाही. त्यामुळे बायोमेट्रिक मशिन पांढरा हत्ती ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. संगणक विभागाकडून दर महिन्याला हजर-गैरहजरचा डाटा सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला जातो. मात्र, त्यानंतर पगारपत्रकाचे ‘सॉफ्टवेअर’ बंद राहत असल्याने ‘मॅन्युअल’ पद्धतीनेच अधिकारी, कर्मचाºयांचे वेतन काढले जाते. त्यासाठी पहिला पंधरवडा निघून जातो. बायोमेट्रिक ‘थंब’ असतानाही प्रत्येक विभागाकडून त्यांच्या अधिनस्थ कर्मचाºयांचा हजेरीपट मागविला जातो व त्यानंतर वेतनाच्या प्रक्रियेला वेग येतो. आयुक्तांनी मनपातील सर्व कर्मचाºयांना बायोमेट्रिक हजेरी व त्याच डाटावरून वेतन करण्याचे आदेश दिले होते.बायोमेट्रिकचा फार्स कशासाठी ?महापालिकेचे पाचही झोन, आरोग्य, नगरसचिव, सामान्य प्रशासन विभाग, लेखाविभाग, शिक्षण विभाग, बाजार व परवाना विभाग आणि आरोग्य विभागात २६ बायोमेट्रिक मशिन्स लावण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या दवाखान्यातही १४ मशिन लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही सर्व कर्मचाºयांना हजेरीपटावर स्वाक्षरी करावी लागते. त्यामुळे बायोमेट्रिकचा फार्स कशासाठी, असा संतप्त सवाल कर्मचाºयांनी उपस्थित केला आहे.वेतनबिलात चुकाच चुकासामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांकडून पगारपत्रके बनविली जातात. मात्र, तीन ते चार महिन्यांपासून अनेकांची पगारबिले चुकत असल्याची तक्रार कर्मचाºयांनी केली आहे. वेतनबिलात त्रुटी निघत असल्याने अनेक कर्मचाºयांचे दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. विशेष म्हणजे चूक मान्य करण्यास कुणीही तयार नसल्याने कर्मचारी मात्र घायकु तीस आले आहेत.
‘मॅन्युअल’ हजेरी, चुकीची वेतनबिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:12 PM
महापालिकेच्या कर्मचाºयांची उपस्थिती अद्याप हजेरी पत्रकावर नोंदविली जात असल्याने बायोमेट्रिक पद्धतीला हरताळ फासला आहे.
ठळक मुद्दे‘बायोमेट्रिक’ला बाय : मनपा कर्मचाºयांची हजेरी अद्यापही लेखीच