अक्षयकुमार काळे यांचे व्याख्यान : ग्रंथप्रदर्शन ,ग्रंथदिंडी,अमरावती : श्रेष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमीत्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणारे सर्व कार्यक्रम श्रोत्यांसाठी नि:शुल्क राहणार आहेत.सकाळी ११ ते रात्री ९ या वेळात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या स्वतंत्र दालनात ग्रंथप्रदर्शन होणार आहेत. यामध्ये भारतातील नामवंत पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. ही वाचकांसाठी पर्वणी राहणार आहे. दुपारी४.३० ते ५.३० या वेळेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष ख्यातनाम समीक्षक अक्षयकुमार काळे यांचे मराठी भाषेचे भवितव्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानसत्राचे अध्यक्षस्थान कुलगुरुमुरलीधर चांदेकर भूषवतील.सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत कस्तुरीगंधित मायमराठी हा गीत-संगीत-गायन-वादन-नृत्य-काव्यवाचन आणि नाटकातील स्वगतांचा समावेश असलेला गायिका केतकी माटेगावकर आणि सुप्रसिद्ध गायक चैतन्य कुळकर्णी यांचा कार्यक्रम होईल.ग्रंथदिंडीचे आयोजन -दुपारी २.३० ते ४.३० या वेळात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नेहरु मैदान येथून ग्रंथदिंडीला सुरुवात होणार असून पालकी, वेशभुषेतील विद्यार्थी, ढोलपथक आदिंचा सहभाग यात असणार आहे. नेहरु मैदान येथून निघालेली ग्रंथदिंडी रेल्वे पुलावरून रेल्वेस्टेशन चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय ते संत सांस्कृतिक भवन असा दिंडीचा मार्ग राहणार आहे. या दिंडीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. ग्रंथदिंडीत पालकीत मराठी भाषेतील नामवंत लेखकांचे ग्रंथांचा समावेश असेल.‘उच्चशिक्षण’च्या योजना मराठी विकीपिडीयावरअमरावती : वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा हा गौरव दिन साजरा करताना ‘संगणक व महाजालावरील मराठी’ या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे.मराठी भाषेच्या साहित्यक्षेत्रामध्ये कुसुमाग्रजांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याचाच एक भाग म्हणून व मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. तथापि गौरव दिनाचे औचित्य साधून कुठले कार्यक्रम व संकल्पना राबवावी, हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नव्याने ठरवून दिले आहे. विकीपिडीया हे जगभरात असंख्य भाषांमध्ये कार्यरत असलेले लोकप्रिय संकेतस्थळ आहे. ही वास्तुस्थिती विचारात घेऊन, मराठी भाषा गौरव दिन केवळ महाराष्ट्रताीलच नव्हे तर जगभरातील मराठी जनांनी मराठी देवनागरी लिपित किमान एक परिच्छेद मराठी विकीपिडयावर टंकलिखित करावा, असे आवाहन उच्च शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत उच्च शिक्षण विभागाशी संबंधित विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महाविद्यालयीन विद्यार्थी/प्राध्यापक/ सर्व शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून, महाजालावरील मराठी लेखनाला कृतीशिल प्रतिसाद द्यावा , सा अनुषंगाने आपल्याशी संबंधित विविध योजनांची माहिती, त्याचप्रमाणे त्या त्या क्षेत्रातील तज्ञांची माहिती मराठी भाषेमध्ये विकीपिडीयावर देण्यात यावी, असे निर्देश उच्च तंत्रशिक्षण विभागाने अधिनस्थ यंत्रणेला दिले आहे.सर्व कायाृलयांनी मराठी भाषा विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी सांस्कृतिक भवनात मराठी भाषा गौरव दिन
By admin | Published: February 26, 2017 12:10 AM