शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अमरावतीत मार्च एंडिंगचा फिव्हर; सुट्टीच्या दिवसात कामकाज कव्हर

By जितेंद्र दखने | Published: March 30, 2024 11:40 PM

पेंडिग कामाचा निपटारा : सर्व विभागात एचओडी, कर्मचारी ठाण मांडून

अमरावती : शासकीय आर्थिक वर्षाचा शेवट आता काही तासांवर आला असताना शनिवारी जिल्हा परिषदेत सुटीचा दिवस असताना सर्वच विभागात मार्च एडिंगचा फिव्हर दिसून आला. या सुटीच्या आर्थिक वर्षातील कामे ३१ मार्च या शेवटच्या दिवसात कव्हर करण्यावर अधिकारी व कर्मचारी यांचा भर देत कार्यालयात ठाण मांडून कामकाज करताना दिसून आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेंतर्गत विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असतो. हा निधी दिलेल्या आर्थिक वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे, अन्यथा अनेक वेळा उपलब्ध निधी वेळेत खर्च न झाल्याने तो परत पाठवावा लागतो. शासनाचा निधी विकासाच्या विविध बाबींवर खर्च व्हावा, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तसे नियोजन सुरू असल्याचे चित्र अनेक शासकीय कार्यालयांत दिसून येते. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शासनाचे योजनांच्या कामांना ब्रेक लागला आहे. मात्र, दरम्यान अनेक कामांना वर्कऑर्डर मिळूनही ती कामे बाकी आहेत. तर काही कामे वेळेत पूर्ण करूनही त्याचा निधी शासनस्तरावर प्रलंबित असतो. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विभागांमार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे दिसून येते. विविध विकासकामे केलेल्या संस्था, कंत्राटदार ही कामाचे बिल वेळेत मिळावे, यासाठी शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांत चकरा मारताना दिसत आहेत. म्हणून शनिवार या सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषदेतील वित्त, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, पाणीपुरवठा, जलसंधारण, शिक्षण, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, एनआरएचएम आदी विभागांत कामकाज सुरू होते. आता मार्च एडिंगसाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या दिवशीही सरकारी सुटी आहे. मात्र, मार्च एडिंगमुळे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटदारांची रेलचेल अधिक वाढल्याचे दिसून आले.

टेबलावरच्या फायलींना हातावेगळ्या करण्यास वेगविविध विकासकामांच्या फाइल बऱ्याचदा संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर पडून असतात. परिणामी, कामाची पेंडन्सी वाढते. कारण, संबंधित कर्मचारी त्या फायलींचा निपटारा लगेच करण्यासाठी फारसा पुढाकार घेत नाहीत ; पण आता मार्च संपत येत असतानाही टेबलवरच असलेल्या फाइल हातावेगळ्या करण्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये शनिवारी दिसून आले.

टॅग्स :AmravatiअमरावतीjobनोकरीGovernmentसरकार