लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांना अडचणी सोडविण्यासाठी एक वर्षाच्या कार्यकाळात प्रयत्न केले. मात्र, काही संचालकांची अपेक्षापूर्ती करू शकलो नाही. या संचालक विरोधामुळे सभापतिपदाचा राजीनामा दिल्याचे अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले.बाजार समितीमध्ये अकरावे सभापती म्हणून प्रफुल्ल राऊत यांनी २८ आॅगस्टला पदभार स्वीकारला होता. एक वर्षाच्या कार्यकाळात खर्चात किमान ५० लाखांची कपात केली. दीड कोटींचे तारण शेतकºयांना दिले. ६.२५ कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव तयार केला आहे. इतरही अनेक विकासकामे केली. मात्र, यामध्ये भ्रष्टाचार केला नाही, असे राऊत म्हणाले.बाजार समितीचे राजकारण झपाट्याने बदलले आहेत. राऊत यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत अविश्वास प्रस्तावाची तयारी सुरू करण्यात आली. यावर ११ संचालकांच्या सह्या झाल्याची माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर राऊत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, प्रफुल्ल राऊत यांनी सायंकाळी ५.३० ला राजीनामा दिला असल्याचे सांगितले.
बाजार समिती सभापतींचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:51 PM
शेतकऱ्यांना अडचणी सोडविण्यासाठी एक वर्षाच्या कार्यकाळात प्रयत्न केले. मात्र, काही संचालकांची अपेक्षापूर्ती करू शकलो नाही. या संचालक विरोधामुळे सभापतिपदाचा राजीनामा दिल्याचे अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले.
ठळक मुद्देपत्रपरिषद : काही संचालकांची अपेक्षापूर्ती नाही