कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या जुन्याच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या मतदारयादीत ग्रामपंचायत सोसायटी मतदारसंघ यासोबतच कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांमधून निवडून आलेले सदस्य हे मतदार आहेत. शासनाद्वारे या सर्व संस्थांच्या निवडणुकीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढच दिलेली असल्यामुळे या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका जोवर होत नाही, तोवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊ शकत नाही. त्यामुळे सहकारी विभागाने मुदतवाढ दिलेली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ५९ नुसार बाजार समितीच्या निवडणुकांना मुदतवाढ देण्याचे अधिकार शासनाला आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. जिल्ह्यातील ६४८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना शासनाने यापूर्वीच मुदतवाढ दिलेली असल्याने त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहे. त्यामुळे शासनाने ही मुदतवाढ दिलेली आहे.
बॉक्स
सात बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला यापूर्वीच मुदतवाढ
जिल्ह्यात अमरावती, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व अचलपूर या सात बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला यापूर्वीच ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याशिवाय, धामणगाव रेल्वे व नांदगाव या बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आता ३१ मार्चपर्यंत प्रशासकराज राहणार आहे.
कोट
सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांंच्या संचालक मंडळांना शासनाने यापूर्वीच मुदतवाढ दिलेली आहे. धामणगाव व नांदगाव बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
संदीप जाधव,
जिल्हा उपनिबंधक