महापालिकेला ठेंगा : पोलीसही स्थितप्रज्ञ, इलेक्ट्रिक डीबीजवळ धोकाअमरावती : श्याम चौकानजीकच्या नगरवाचनालयासमोर अतिक्रमणाने बाजार थाटला आहे. या भागातील अतिक्रमणावर अनेकदा हातोडा फिरविण्यात आला. मात्र २ ते ३ दिवसांनंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते. येथील अतिक्रमणधारक महापालिका आणि पोलीस प्रशासनाला जुमानत नसल्याचे तूर्तास चित्र आहे. जोशी मार्केट (जे अँड डी मॉल) मागील परिसरात नगर वाचनालयासमोरली सार्वजनिक जागेवर हातगाडींवर कपडे विके्रत्यांनी दुकाने थाटली आहेत. नगर वाचनालयाचे प्रवेशद्वार अतिक्रमणाने व्यापले आहे. पार्किंग दुतर्फा असे अंकित असलेल्या फलकाला बेदखल करीत महिनोमहिने येथे दुकानदारी थाटली आहे. श्याम चौकातून बारसमोरचा रस्ता या हातगाड्यांनी इतका व्यापला आहे की, पायीही धड चालता येणे शक्य नाही. इलेक्ट्रिक डीबीजवळ अतिशय धोकादायक पद्धतीने अतिक्रमण करुन व्यवसाय केला जात आहे. (प्रतिनिधी)पार्किंगच्या जागेवर अतिक्रमणविशेष म्हणजे नगर वाचनालयासमोरील या जागेवर दोन्ही बाजूंनी पार्किंग असे फलक लागले आहे. अर्थात पालिकेच्या लेखी ही जागा पार्किंगसाठी आरक्षित आहे. मात्र पार्किंगऐवजी येथे राजरोसपणे हातगाड्यांवर फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटला जातो. व्यावसायिकांव्यतिरिक्त अन्य दुचाकी पार्किंगला येथे अघोषित बंदीच आहे. वाहतूक पोलिसांनी करावी करवाईवाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या अतिक्रमणावर वाहतूक पोलीससुद्धा कारवाई करू शकतात. मात्र या कारवाईसाठी कुणीही पुढे धजावत नाही. सुमारे ६ महिन्यांपूर्वी या संपूर्ण भागातील अतिक्रमण पोलिसांच्या उपस्थितीत हटविण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी अतिक्रमण नव्याने थाटण्यात आले. हा संपूर्ण भागच अतिक्रमणाने व्यापल्यामुळे वाहतूक समस्येत भर पडली आहे.
नगरवाचनालयासमोर ‘अतिक्रमणा’चा बाजार
By admin | Published: March 04, 2016 12:10 AM