शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

तुरीसाठी ‘बाजार हस्तक्षेप’ योजना

By admin | Published: May 30, 2017 12:03 AM

केंद्र शासनाने नाफेडव्दारा सुरू असलेली तूर खरेदी २६ मेपासून बंद केल्याने आता राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत उर्वरित तूर खरेदी करण्यात येत आहे.

नाफेडचे हात वर : अद्याप चार लाख क्विंटल तूर मोजणी बाकीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने नाफेडव्दारा सुरू असलेली तूर खरेदी २६ मेपासून बंद केल्याने आता राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत उर्वरित तूर खरेदी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत यार्डात चार लाख तीन हजार ५७९ क्विंटल तूर मोजणी बाकी आहे. डीएमओव्दारा शनिवारी १५ हजार २८० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.जिल्ह्यासह राज्यात १० मेपासून नाफेडच्यावतीने पीएसएस योजनेंतर्गत तुरीची खरेदी सुरू करण्यात आली. मात्र, एक लाख क्ंिवटल खरेदीची अट ठेवण्यात आली होती. ही मर्यादा संपल्याने केंद्राने तूर खरेदी बंद केली. मात्र हजारो क्ंिवटल तूर बाजार समित्यांमध्ये पडून असल्याने शासनाचेवतीने पूर्वीचीच ‘बाजार हस्तक्षेप’ योजना शनिवारपासून सुरू करण्यात आली. १० मेपासून ‘पीएसएस’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ केंद्रांमधील १० हजार १११ शेतकऱ्यांची एक लाख ८५ हजार ३३१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर येथे १,२२७ शेतकऱ्यांची २५,४१५ क्विंटल, अमरावती येथे ७२० शेतकऱ्यांची १९,३४० क्विंटल, अंजनगाव सुर्जी येथे १,०८० शेतकऱ्यांची १८,६६२ क्विंटल, डीएमओद्वारे खरेदीअमरावती : चांदूरबाजार येथे १,०५८ शेतकऱ्यांची २०,०२० क्विंटल, चांदूररेल्वे येथे ७१३ शेतकऱ्यांची ११,४५० क्विंटल, दर्यापूर येथे ६०८ शेतकऱ्यांची १४,००८ क्विंटल, धामणगाव येथे १,८५९ शेतकऱ्यांची २७,९५८ क्विंटल, मोर्शी येथे ६४३ शेतकऱ्यांची ११,२११ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर येथे ५९२ शेतकऱ्यांची १२,१५३ क्ंिवटल, तिवसा तेथे २६० शेतकऱ्यांची ३,७५० क्विंटल तर वरूड केंद्रावर १,३५१ शेतकऱ्यांची २१,३६६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.‘बाजार हस्तक्षेप’ योजनेच्या पहिल्याच दिवशी ८६५ शेतकऱ्यांची १५,२८० क्चिंटल तूर डीएमओव्दारा खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये अचलपूरला २,४२५ क्विंटल, अमरावती १,१६३, अंजनगाव सुर्जी १,७१६, चांदूरबाजार १,६४९, चांदूररेल्वे १,०६५, दयारपूर १,८०७, धामणगाव १,५४८, धारणी १७३, मोर्शी १,१८५, नांदगाव खंडेश्वर ५१४, तिवसा ८९, व वरुड केंद्रावर ९४५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.१८ हजार शेतकऱ्यांची तूर मोजणी बाकीनाफेडद्वारा १० मे रोजी ‘पीएसएस’ योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून आवक झालेल्या तुरीपैकी १७,७६६ शेतकऱ्यांची चार लाख तीन हजार ५७९ क्विंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर १,७४८ शेतकऱ्यांची ३७,७५७ क्विंटल, अमरावती ३,५३९ शेतकऱ्यांची ९९,६१९, अंजनगाव १,८८५ शेतकऱ्यांची ३१,८९०, चांदूरबाजार १,२०२ शेतकऱ्यांची २७,६२७, चांदूररेल्वे ८३९ शेतकऱ्यांची १९,१८६, दर्यापूर २,६५९ शेतकऱ्यांची ७३,७२०, धामणगाव ४०८ शेतकऱ्यांची १२,३९३, धारणी येथे ३८ शेतकऱ्यांची ८८२, मोर्शी १,६२४ शेतकऱ्यांची ३१,०६७, नांदगाव खंडेश्वर १,९२५ शेतकऱ्यांची ३४,८८७, तिवसा ८०४ शेतकऱ्यांची ११,६६१ व वरूड केंद्रावर १,०९५ शेतकऱ्यांची २२,९९६ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.