लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यानंतर आता मसण्याउद या प्राण्याची भीती वाढली आहे. चार ते पाच मसन्याउदच्या कळपाने प्रशासकीय इमारतीत ठिय्या मांडला आहे. दोन दिवसांपूर्वी विद्या विभागातील कागदपत्रांची प्रचंड नासधूस या कळपाने केली. विद्यापीठातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होण्याची भीती आता व्यक्त होत आहे.विद्यापीठ परिसरात बिबट, हरीण, रानडुक्कर, घुबड, मोर यांसह सरपटणाऱ्या वन्यजीवांचा वावर आहे. त्यातच प्रशासकीय इमारतीच्या विविध विभागांत रात्रीच्या सुमारास मसन्याउदाचा संचार वाढला आहे. त्यांच्या कळपाने काही महत्त्वाची कागदपत्रे कुरतडल्याची तक्रार विद्या विभागाने कुलसचिव तुषार देशमुख यांच्याकडे केली. रात्रीला हे प्राणी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलवर घाण करून ठेवतात. या दुर्गंधीमुळे काम करणे कठीण झाल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.प्रशासकीय इमारतीत चार ते पाच मसन्याउदचा मुक्त संचार आहे. त्यांच्याकडून यापूर्वी कागदपत्रांची नासधूस झाली नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी केलेल्या नुकसानामुळे वनविभागाला बंदोबस्तसाठी कळविले आहे.- रवींद्र सयाम, सहायक कुलसचिव, सुरक्षा विभाग
विद्यापीठात मसन्याउदचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 1:31 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यानंतर आता मसण्याउद या प्राण्याची भीती वाढली आहे. चार ते पाच मसन्याउदच्या कळपाने प्रशासकीय इमारतीत ठिय्या मांडला आहे. दोन दिवसांपूर्वी विद्या विभागातील कागदपत्रांची प्रचंड नासधूस या कळपाने केली.
ठळक मुद्देप्रशासकीय इमारतीत ठिय्या : विद्या विभागात कागदपत्रांची नासधूस