पालकमंत्र्यांची उपस्थिती, शहर कॉग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांचा सहभाग
अमरावती : शहर काँग्रेस कमिटीतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजकलम चौक स्थित काँग्रेस कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान हेच श्रेष्ठदान व जीवदान, हा संदेश यावेळी देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके याच्या उपस्थितीत करण्यात आले.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या शिबिरात युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत व महिलांनीदेखील हिरीरीने सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सहभाग दर्शविला. कोरोना महामारीच्या काळातही ११९ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात डॉ. पंजाबराव देशमुख रक्तपेढीचे डॉ. रुची सारडा, सचिन काकडे, साहेबराव अलाहाबादे, हरीश झाड़े, पुरुषोत्तम पवार या टिमसह रक्तदान समितीचे, महेंद्र भुतडा, अजय दातेराव, श्याम शर्मा, राकेश ठाकूर, श्रीमेश श्रॉफ, संदीप खेडकर, उपाध्यक्ष संजय वाघ, सरचिटणीस राजू भेले, नगरसेवक शोभा शिंदे, सलीम बेग, प्रशांत महल्ले, प्रशांत ड़वरे, समाजसेवक फिरोज खाँन, उपाध्यक्ष राजा बांगडे, यु.का. अध्यक्ष नीलेश गुहे, अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल रफिक, महासचिव सागर देशमुख, बडनेराचे अध्यक्ष योगेश बुंदेले, जिल्हाध्य्क्ष अनुसूचित जाती-जमाती सागर कलाने, शहराध्यक्ष राजेश चव्हाण, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, भैयासाहेब निचळ, जयश्री वांनखडे, अर्चना सवई, जुबैर, रज्जू बाबा, प्रीतम ठाकूर, प्रकाश नांदूरकर, खोज्यामा खुर्रम, आमोल इंगळे आदी उपस्थित होते.