अमरावती : शहराचा विकास कसा आणि कोणाच्या कारकिर्दीत झाला, याचे साक्षीदार मतदार म्हणून तुम्ही सर्वच आहात. ‘आधी केले - मगच सांगितले’ या भूमिकेतून मी तुमच्यासमोर आलो आहे. शहर विकासाचा मास्टर प्लॅन मी राबवित आहे. त्यामध्ये झालेल्या विकासकामांची पडताळणी करावी, खात्री करावी आणि नंतरच मला मतदान करावे, असे आवाहन सुनील देशमुख यांनी सोमवारी केले.कांतानगर परिसरात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी देशमुख म्हणाले, विकासाचे राजकारण आजवर केले. त्यात तडजोड केली नाही. विकासकामे करण्याची प्रत्येकाची क्षमता ओळखून मतदारांनी मतदान केले पाहिजे. पाच वर्षांत शहरात कोट्यवधींची विविध विकासकामे केलीत; परंतु त्याचा गाजावाजा केला नाही. सुनील देशमुख यांनी शहरविकासाची गती कायम राखण्याची ग्वाही दिली. व्यासपीठावर उपमहापौर संध्या टिकले, भाजप नेते किरण पातूरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, महानगरप्रमुख पराग गुडधे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, प्रदीप बाजड, चंदू बोमरे, सुरेखा लुंगारे, प्रकाश तेटू, प्रकाश बनसोड आदींची उपस्थिती होती.
शहर विकासाचा ‘मास्टरप्लॅन’ : सुनील देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM
कांतानगर परिसरात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी देशमुख म्हणाले, विकासाचे राजकारण आजवर केले. त्यात तडजोड केली नाही. विकासकामे करण्याची प्रत्येकाची क्षमता ओळखून मतदारांनी मतदान केले पाहिजे.
ठळक मुद्देमतदारांना कामांचा लेखाजोखा : कांतानगर परिसरातील सभेला व्यापक प्रतिसाद