महापौरांनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:01:24+5:30
महापालिका प्रशासनत अलीकडे घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. यात नागरिकांचा स्वप्नभंग झाला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सार्वजनिक व वैयंक्तिक शौचालय बांधकामाचा सर्वात मोठा घोटाळा समोर आलेला आहे. ५० लाखांची रेस्क्यू व्हॅन २.५ कोटींना खरेदी करण्यात आलेली आहे. सायबर टेक घोटाळाप्रकरणी एफआयआरबाबत प्रशासन गप्प बसले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन वर्षांत महापालिकेत केवळ घोटाळ्यांचे सत्र सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात स्वच्छतेची वाट लागली आहे. या सर्व प्रकारांत महापालिका प्रशासन गप्प बसले आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी गुरुवारी युवक काँग्रेसने केली. प्रचंड घोषणाबाजी करीत विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले.
महापालिका प्रशासनत अलीकडे घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. यात नागरिकांचा स्वप्नभंग झाला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सार्वजनिक व वैयंक्तिक शौचालय बांधकामाचा सर्वात मोठा घोटाळा समोर आलेला आहे. ५० लाखांची रेस्क्यू व्हॅन २.५ कोटींना खरेदी करण्यात आलेली आहे. सायबर टेक घोटाळाप्रकरणी एफआयआरबाबत प्रशासन गप्प बसले आहे. सध्या कोरोना विषाणूच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या निधीची अफरातफर होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या सर्व प्रकारांत महापालिाकेची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी युवक काँग्रसचे शहराध्यक्ष नीलेश गुहे, एनएसयूआयचे अध्यक्ष संकेत कुलट, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष देवयानी कुर्वे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर तथा नगरसेवक विलास इंगोले, नगरसेवक प्रदीप हिवसे, सलीम बेग युसूफ बेग आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.