अमरावती : दैनंदिन स्वच्छतेच्या प्रभागनिहाय कंत्राटावर स्थायी समितीची मोहोर उमटण्यापूर्वीच विद्यमान स्वच्छता कंत्राटदारांनी महापौर आणि अन्य पदाधिकाºयांचे ‘फोटोजेनिक ’आभार मानल्याने त्यांचा उताविळपणा उघड झाला आहे. एकल कंत्राटाची प्रक्रिया होईपर्यंत प्रभागनिहाय स्वच्छतेसाठी अल्प मुदतीची निविदा काढण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, तो प्रस्ताव स्थायीसमोर येऊन मंजूर होण्याची वाट न पाहता अतीउत्साही कंत्राटदार लॉबीने महापौर संजय नरवणेंचे जाहीर आभार मानले.सत्ताधीश अनभिज्ञस्थायीची मोहोर उमटण्यापूर्वी कंत्राटदारांनी असा आततायीपणा करायला नको होता, अशा प्रतिक्रिया महापालिकेत उमटली आहे. स्वच्छता कंत्राटदार संजय माहुलकर, विजय गंगन आणि त्यांच्या सहकाºयांनी बुधवारी दुपारी महापौर व सभागृहनेत्याचे दालन गाठून प्रभागनिहाय कंत्राटासाठी ‘अॅडव्हान्स’मध्ये आभार मानलेत. कंत्राटदारांच्या शिष्टमंडळात ब्लॅकलिस्ट व टर्मिनेट कंत्राटदारही सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापौर व सभागृहनेत्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत आणि आभार मानणाºया कंत्राटदारांनी नकळत का होईना स्थायी समितीला आव्हान दिल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.स्वच्छता कंत्राटदारांची मनमानी संपविण्यासाठी स्थायी समितीने एकल कंत्राट पद्धतीच्या प्रस्तावाला १६ सप्टेंबरला मंजुरी दिली. तो आमसभेत मंजूर होण्याच्या भीतीने स्वच्छता कंत्राटदारात अस्वस्थता पसरली. हे कंत्राट मल्टिनॅशनल कंपनीला जाऊ नये, यासाठी या लॉबीने जंगजंग पछाडले. सर्वच लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले. मात्र, स्थायीने मल्टिनॅशनल कंपनीवर शिक्कामोर्तब केल्याने या कंत्राटदारांच्या पायाखालची वाळू सरकली. तथापि दोन दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून ‘प्रभागनिहाय’चा ‘सहामाही’ निर्णय घेतल्याने या लॉबीचे घोडे गंगेत न्हाले. व निविदा प्रक्रियेचा विषय स्थायीत जाण्यापूर्वी आणि त्याप्रस्तावाला मंजुरी मिळण्याआधीच कंत्राटदारांनी भाजप सत्ताधीशांचे आभार उरकून घेतले. प्रशासनाने सहा महिन्यांसाठीच नव्याने निविदा करण्याचा मानस व्यक्त केला असला तरी स्थायी सभापती एकल कंत्राटावर ठाम असल्याने कंत्राटदारांनी मानलेले आभार औटघटकेचे तर ठरणार नाहीत ना, असा सूर उमटत आहे.महापौरांची प्रांजळ कबुलीबुधवारी दुपारी स्वच्छता कंत्राटदार महापौरांच्या दालनात पुष्पगुच्छ घेऊन पोहोचले. एकल कंत्राटाची प्रक्रिया अंतिम होईपर्यंत प्रशासनाने प्रभागनिहाय पद्धतीचा प्रस्ताव ठेवल्याने आभार मानत असल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. तत्पूर्वी महापौर अनभिज्ञ होते. मात्र, विषय समजल्यानंतर महापौरांनी तो विषय स्थायीचा असल्याचे सांगितले.
कंत्राटदार लॉबीकडून महापौरांचे ‘अॅडव्हान्स’ स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 9:27 PM
दैनंदिन स्वच्छतेच्या प्रभागनिहाय कंत्राटावर स्थायी समितीची मोहोर उमटण्यापूर्वीच विद्यमान स्वच्छता कंत्राटदारांनी महापौर आणि अन्य पदाधिकाºयांचे ‘फोटोजेनिक ’आभार मानल्याने त्यांचा उताविळपणा उघड झाला आहे.
ठळक मुद्देप्रभागनिहाय स्वच्छता कंत्राट : स्थायी समितीला आव्हान