लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : नाफेडची शासकीय तूर खरेदी मंगळवारी बंद झाली. मात्र, एरवी ६ वाजता बंद होणारी मोजणी रात्री १० पर्यंत सुरू होती. या वेळेचा फायदाही बहुतांश व्यापाऱ्यांनी उचलल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.तूर खरेदीसाठी शासनाने १५ मे ही अंतिम तारीख दिली होती. ७,५८६ आॅनलाइन नोंदणीपैकी ३ हजार ७६९ शेतकऱ्यांची ४८ हजार ९९५ क्विंटल तूर १५ मे रोजी रात्री उशिरापर्यंत मोजण्यात आली. अद्यापही ३,८१७ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. त्यापूर्वी ११ मेपासून गोदामचे कारण पुढे करून खरेदी बंद होती, तर १० मे रोजी उर्वरित शेतकºयांच्या तुरी मोजण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यांच्या तुरी मोजण्यात आल्या. खरेदी-विक्री संघाच्या एका कर्मचाऱ्यानेच ५०० क्ंिवटलपेक्षा अधिक तूर नाफेडला विकल्याची चर्चा असून, त्याचा शोध नाफेड घेणार असल्याचे सांगितले जाते. व्यापाऱ्यांनी शेतकºयांच्या नावावर स्वत:ची विकल्याचे एका अधिकाऱ्यानेही मान्य केले.नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर पुढील आदेश आल्यांनतर मोजली जाईल. सातबारानुसार नोंदणी झालेल्या शेतकºयांना पाचारण करण्यात आले. तशा आमच्याकडे नोंदी आहेत.- नारायण चरपे,व्यवस्थापक, खरेदी-विक्री संस्थाशासनाने १५ मे ही अंतिम तारीख दिल्यामुळे मंगळवारी तूर खरेदी बंद केली. आतापर्यंतच्या झालेल्या खरेदीत व्यापाºयांच्या मालाचा शोध घेण्यात येईल.- राजेंद्र मदारे,सहायक निबंधकआॅनलाइन नोंदणीनुसार १० मे रोजी मोजमाप होते. खरेदी विक्री संस्थेच्या कर्मचाºयांनी मला कोणताही मेसेज किंवा फोन केला नाही. मात्र, रजिस्टरवर फोन केल्याच्या नोंदी घेतल्यात. माझ्यासरखे अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत.- प्रदीप देवते, शेतकरी
मोजमाप केंद्र रात्री १० वाजता झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:23 PM
नाफेडची शासकीय तूर खरेदी मंगळवारी बंद झाली. मात्र, एरवी ६ वाजता बंद होणारी मोजणी रात्री १० पर्यंत सुरू होती. या वेळेचा फायदाही बहुतांश व्यापाऱ्यांनी उचलल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.
ठळक मुद्देशासकीय खरेदीत सावळागोंधळ : शेतकऱ्यांना तूर विक्रीत डावलले