शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

‘महावितरण’चे मोजमाप महापालिकेने आवळला पाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 5:00 AM

महापालिकेच्या १३.६६ कोटींच्या एलबीटीची रक्कम थकीत असतानाही शहरातल्या पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणद्वारे खंडित करण्यात आला.  महापालिका प्रशासनात याचे जोरदार पडसाद उमटले. कर विभागाने २९ जून रोजी १३.६६ कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणला जप्तीची नोटीस पाठविली. ती नाकारण्यात आल्याने कर विभागाद्वारा थकबाकी रक्कमेचा जप्तीनामा येथील श्रीकृष्ठ पेठ येथील महावितरण कार्यालयास चिकटविला.

ठळक मुद्दे१३.६६ कोटींच्या थकीत रकमेचे प्रकरण, जप्ती नोटीसची मुदत संपली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरण विरुद्ध महापालिका या वादाची धग अद्याप कायम आहे. महापालिकेने बजाविलेल्या जप्तीनाम्याची मुदत बुधवारी संपुष्टात आल्याने सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी महावितरणच्या श्रीकृष्णपेठ येथील कार्यालयाचे मोजमाप घेतले. आता या मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव सहायक संचालक नगर विकास (एडीटीपी) कडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या १३.६६ कोटींच्या एलबीटीची रक्कम थकीत असतानाही शहरातल्या पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणद्वारे खंडित करण्यात आला.  महापालिका प्रशासनात याचे जोरदार पडसाद उमटले. कर विभागाने २९ जून रोजी १३.६६ कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणला जप्तीची नोटीस पाठविली. ती नाकारण्यात आल्याने कर विभागाद्वारा थकबाकी रक्कमेचा जप्तीनामा येथील श्रीकृष्ठ पेठ येथील महावितरण कार्यालयास चिकटविला. १५ दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास जप्तीतील मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे त्यात नमूद केले होते. दरम्यान, महावितरणद्वारे समायोजनाचा प्रस्ताव महावितरण कडून न येता कारवाईला स्थगिती देण्याबाबत दोन पत्रे देण्यात आली. त्यामुळे महापालिकाद्वारे कारवाईची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजे जप्तीतील मालमत्तेचे मोजमाप. बुधवारी ती घेण्यात येऊन मूल्यांकनासाठी संबंधितांकडे पाठविण्यात आला. त्यामुळे थकबाकीच्या वसुलीसाठी महापालिकेने आता लिलावाच्या दृष्टीने पाश आवळण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या थकबाकीचे नियोजनासाठी महावितरणद्वारे वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव प्रक्रियेत आहे. समायोजनासाठी अद्याप पत्र प्राप्त नाही. मात्र, प्रक्रियेला स्थगिती द्यावी, यासाठी महापालिकेला पत्र दिले असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महापालिकाद्वारे सुरू असलेली प्रक्रिया ही नियमानुसार आहे. यामध्ये नोटीस बजावल्यानंतर व विहिद कालावधी संपल्याने प्रक्रिया सुरू झाली असल्याचे महापालिकेचे कर निर्धारकअधिकारी महेश देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

अशी राहणार पुढील प्रक्रियासंबंधित कार्यालयाचे मोजमाप घेण्यात आल्यानंतर त्याचे एडीटीपीद्वारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यामध्ये त्या कार्यालयाचे प्रांगण व इमारतीचे मूल्यांकनाचा समावेश आहे. याला प्रसिद्धी दिल्यानंतर जप्तीतील मालमत्तेची बोली लावली जाते. खरेदीदार न आल्यास ही मालमत्ता आयुक्तांच्या नावाने केली जात असल्याचे महापालिकेच्या कर विभागाने सांगितले.

महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर प्रक्रिया सुरू झालेली आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी भेट घेतली व समायोजनासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. - प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांची भेटवादावर तोडगा काढण्यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे कारवाईला स्थगिती देण्याबाबत दोन पत्र देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, समायोजनाचा विषय त्यात नसल्याने प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण