सभेच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद सेवा संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून अरविंद तट्टे, मोर्शी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर धोटे, सचिव प्रवीण लांडे, रमेश मोहकार, प्रकाश घोरमाडे, सुधाकर राजस, बाळासाहेब काळे, लवकुमार पाथरे, विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक जे.एम.देशमुख, अविनाश साळकर, संजय कांदलकर, राजेंद्र हिरडे, संदीप ढोरे, गजानन रोडगे, रोहित मेश्राम उपस्थित होते. या सभेत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, आयकरबाबत असणाऱ्या विविध अडचणी, शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी, भविष्य निर्वाह निधी, शिक्षकांच्या विविध रजा व रजांचे रोखीकरण, ऑनलाईन अभ्यासक्रम, ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करणे व मुख्याध्यापकांना येणाऱ्या विविध प्रशासकीय अडचणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी हिवरखेड येथील नवोदय विद्यालयात सेवानिवृत्त झालेले प्रकाश घोरमाडे, गांधी विद्यालय (काटपूर) येथील सुधाकर राजस, ई.एस. हायस्कूल (रिद्धपूर) येथील बाळासाहेब काळे या मुख्याध्यापकांचा शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवनियुक्त मुख्याध्यापक विजय काकडे (लोकमान्य विद्यालय पोरगव्हाण), श्रीकांत देशमुख (शिवाजी शाळा, मोर्शी), सविता ठाकरे (नवोदय विद्यालय, हिवरखेड), विनोद पाचडे (ई.एस. हायस्कूल, रिद्धपूर), धोटे (गांधी विद्यालय, काटपूर) यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. संचालन मीनाक्षी तट्टे, प्रवीण लांडे, प्रास्तविक जगदीश देशमुख व आभार प्रदर्शन मंजूषा देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.