कहीं खुशी कहीं गम : प्रशासकीय, आपसी बदली प्रक्रिया सुरूअमरावती : मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांची बदली प्रक्रिया उशिरा का होईना, मात्र शिक्षण विभागाने सायन्सस्कोर शाळेत १२ जून रोजी सुरू केली. यात पहिल्या दिवशी शिक्षण विभागाने मेळघाटातील २०८ शिक्षकांची सपाटीवर बदली केली आहेत. एवढेच शिक्षक सपाटीवरील भागातून मेळघाटात पाठविले आहेत. या बदली प्रक्रियेत महिला शिक्षकांना मेळघाटातून प्लेन एरियात आणण्यात आले आहे. या अचानक मुहूर्त स्वरूप देण्यात आल्याने मेळघाटातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे तर प्लेनमधून मेळघाटात पाठविण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र पहावयास मिळाले. शिक्षकांच्या बदल्या काही वर्षांत विविध तांत्रिक कारणांमुळे रखडल्या होत्या. यात मेळघाटात दहा ते बारा वर्षे सेवा बजावणारे शिक्षक बदलीसाठी विविध प्रकारे आंदोलन करीत होते. मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या प्रशासकीय व आपसी बदल्यांची समुपदेशनाव्दारे बदली प्रक्रिया रविवारपासून सुरू झाली आहे. १२ जून रोजी २०८ सहायक शिक्षकांच्या मेळघाट व पलेन एरियामधून एवढ्याच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा बदल्यामध्ये समावेश आहे. यावेळी बदली प्रक्रि येत डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत व शिक्षण विभागाचे अधिक्षक संजय राठी, पकंज गुल्हाने, तुषार पावडे तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय शिक्षक नेते सुनील कुकडे, किरण पाटील इतर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सायन्सस्कोअर शाळेला यात्रेचे स्वरूपशिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया अचानकच राबविण्याचा निर्णय घेतला. बदली प्रक्रियेसाठी मेळघाटसह जिल्ह्याच्या काणा कोपऱ्यातून शिक्षकांनी मोठया संख्येने शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या त्यामुळे सायन्सस्कोअर शाळेला यात्रेचे स्वरूप आले होते. शासन निर्णयानुसार बदल्या नाहीत ?सन २०१४-१५ च्या शासन निर्णया नुसार या बदल्या ३१ मे पर्यत करणे आवश्यक होते. याशिवाय १० टक्या प्रमाणे बदल्या होणे अपेक्षित असताना ३० टक्के प्रमाणे बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे नियमबाह्य बदली केल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
जिल्हा परिषदेच्या २०८ शिक्षकांची मेळघाट वारी
By admin | Published: June 13, 2016 1:36 AM