- नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : सोमवारपासून तीन दिवसांच्या ऐतिहासिक मोहिमेला मेळघाटात प्रारंभ झाला. याचा परिणाम दुर्गम भागातही दिसून आला. अमावशा-पौर्णिमेप्रमाणे दिसणारे कर्मचारी, कधीच वेळेवर शाळा न उघडणा-या शिक्षकांना एका दिवसातच शिस्त लागल्याचे आजच्या स्थितीवरून दिसून आले. महिन्यातून एखाद्या दिवशी दर्शन देणारे ग्रामसेवक विविध विभागाचे कर्मचारी चक्क रविवारपासूनच मेळघाटात मुक्कामी आल्याने गावकºयांनासुद्धा आश्चर्याचा धक्काच बसला आहे. 'ड्रिम मेळघाट क्लिन मेळघाट'मध्ये अख्खे जिल्हा प्रशासन सोमवारीपासून धारणी व चिखलदा तालुक्यात मुक्कामी असल्याने त्याचा धसका शाळाही अगदी वेळेवर उघडून त्यात शिक्षक उपस्थित झाले. जिल्हा परिषदेच्यावतीने दुसºया टप्प्यात मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शौचालय निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे दीडशेवर अधिकारी, हजारा७वर कर्मचारी तीन दिवस मेळघाटात ठाण मांडून आहेत. एका उद्दिष्टपूर्तीनंतर ते बाहेर निघणार आहेत.
बहोत दिनो के बाद दिखा रे साहेबोनमेळघाटात सुविधांची वानवा आहे. येथे नियुक्ती म्हणजे अनेकांच्या मनी काळ्या पाण्याची शिक्षाच. यामुळे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. कामकाजाचा दिवस निश्चित करून दौरा काढला जातो, असा प्रकार येथे सर्रास दिसून येतो. जि.प. प्रशासन शौचालय बांधकामासाठी तीन दिवसांच्या मिशनवर असल्याने ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, नरेगा आदी सर्वच विभागाचे मेळघाटातील कर्मचारी रविवारपासून मुख्यालयी उपस्थित आहेत. यामुळे शाकीय कार्यालये वेळेत सुरू झाली. आवागड येथे तर ‘‘आज कसा आये रे साहेब बहोत दिनो बाद दर्शन दिया’’ असा टोला आदिवासी कर्मचा-याकडे पाहून लागवत असल्याचे चित्र अनुभवता आले.
वेळेवर वाजली शाळेची घंटा मेळघाटातील बहुतांश शाळा मनात येईल तेव्हा उघडल्या जात असल्याचे चित्र गत आठवड्यात चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी बंद शाळेचा सेल्फी घेऊन उघडकीस आणले होते. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. परंतु सोमवारपासून शिक्षकांची उपस्थिती आणि शाळांची घंटा, प्रार्थना, चवदार खिचडी, स्वच्छता आदी सर्व बाबी सुरळीत होत आहेत.
मेळघाटात ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी मुक्कामी असल्याचा आनंद आहे. शौचालय बांधकामाप्रमाणेच इतरही योजना कामे याचप्रमाणे झाल्यास आदिवासींना खरा लाभ मिळेल. - नानकराम ठाकरे, उपसभापती पं.स. चिखलदरा