शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खासदार आदर्श ग्राम कळमखार घाणीने बरबटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 10:06 PM

खासदार अडसूळ यांनी दत्तक घेतलेले आदर्श ग्राम कळमखार दैनावस्थेला पोहोचले आहे. या गावात प्रवेश करताना मुख्य मार्गावरील कचऱ्याचे ढीग आपले स्वागत करताना दिसून येते.

ठळक मुद्देघरकूल अपूर्ण : आरोग्य केंद्राजवळ कचऱ्याचा ढीग, नाल्या अस्वच्छ

आॅनलाईन लोकमतधारणी : खासदार अडसूळ यांनी दत्तक घेतलेले आदर्श ग्राम कळमखार दैनावस्थेला पोहोचले आहे. या गावात प्रवेश करताना मुख्य मार्गावरील कचऱ्याचे ढीग आपले स्वागत करताना दिसून येते.कळमखार हे धारणी मुख्यालयापासून अमरावती-बऱ्हाणपूर मुख्य मार्गावर अवघे ७ कि.मी. अंतरावर आहे. तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव असल्यामुळे ग्रामविस्तार अधिकारी (व्हीडीओ) ग्रामपंचायतला दिले आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी हे गाव चार वर्षांपूर्वी आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे. गेल्या चार वर्षांत या गावात उल्लेखनीय असे कोणतेही काम झालेले नाही. लोकांना गावात मोठी सुविधा देण्यात येणार असल्याचा गवगवा करण्यात आला होता. प्रत्यक्षात त्या प्रस्तावित योजनांची अंमलबजावणी झाले नसल्याचे चित्र आहे. महिन्यातून एकदा गाव पंचायतीत खासदारांच्या उपस्थितीत बैठकी होतात. पण, समस्यांवर तोडगा शोधला जात नाही.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पश्चिमेला लागूनच कचऱ्याचा ढीग आहे, तर उत्तरेला रस्त्यालगत नाली कचऱ्याने तुडूंब भरले असल्याने डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचा परिणाम दवाखान्यात दाखल रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे.घरकुलातून भ्रष्टाचारगावात घरकुल योजनेची अर्धवट कामे भ्रष्ट कारभाराचे कथन करीत आहे. हप्ता मिळत नसल्याने अनेक लाभार्थींचे घरकुल अर्धवट अवस्थेत आहे. याबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला असता, धनादेशाकरिता पैशांची मागणी करण्यात होत असल्याची माहिती मिळाली.एटीएम झाले कॅशलेससेंट्रल बँकेचे एटीएम केंद्र गावात मुख्य मार्गावर आहे. कॅशलेस व्यवहार करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न हे एटीएम पूर्ण करीत आहे. या एटीएममध्ये नेहमीच ‘कॅश उपलब्ध नाही’ असा फलक आढळून येतो.