शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्ह्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुरुष माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:14 AM

महाराष्ट्र शासनाने कुटुंब कल्याण योजना ५० वर्षांपासून अंमलात आणलेली आहे. यात पुरुषांनी सहभाग नोंदवावा म्हणून काही प्रमाणात लाभाचीदेखील तरतूद ...

महाराष्ट्र शासनाने कुटुंब कल्याण योजना ५० वर्षांपासून अंमलात आणलेली आहे. यात पुरुषांनी सहभाग नोंदवावा म्हणून काही प्रमाणात लाभाचीदेखील तरतूद केलेली आहे. स्त्रीयांऐवजी पुरुषांनी शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजनास मदत व्हावी, हा यामागील उद्देश आहे. मात्र, अलीकडे पुरुषांनी या शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सन २०-२१ ७३ पुरुषांनीच ही शस्त्रक्रिया केल्याचे जिल्हा परिषदेच्या दफ्तरी नोंद आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागात ८८५ आणि शहरी भागात १९६ पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु ग्रामीण भागात ६५, तर शहरी भागात केवळ ८ पुरुषांनी वर्षभरात ही शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. स्त्रीयांना १२९९७ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. यात ग्रामीण भागात १०६०५ आणि शहरी भागात १४२९ शस्त्रक्रिया अपेक्षित होत्या. मात्र, एप्रिल ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ग्रामीण भागात ९६२, तर शहरी भागात २३९१ स्त्रीयांची शस्त्रक्रिया आटोपली. याची टक्केवारी १८.४० इतकी आहे. ८७ बिनटाका शस्त्रक्रिया झालेल्या आहे. टाका ॲब्डोमिनलच्या २२३१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. याची टक्केवारी १८.७२ इतकी आहे. अनावश्यक गर्भधारणा रोखण्याकरिता पर्यायी व्यवस्था म्हणून तांबीचा वापर वाढला. त्यामुळे आता कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

बॉक्स

तालुकानिहाय शस्त्रक्रिया

तालुका उद्दिष्ट प्रगतीपर टक्केवारी

वरूड ११७७ ४५० ३८.२

चिखलदरा ६४९ २३८ ३६.५

अचलपूर १६४५ ५८५ ३५.६

धारणी ११८९ २३३ १९.६

मोर्शी १०४२ १८४ १७.७

नांदगाव ७९५ १३९ १७.५

भातकुली ६८१ ११९ १७.५

धामणगाव ७६६ १२० १५.७

दर्यापूर ९६० १२० १२.५

अमरावती ७६९ ७१ ९.२

तिवसा ७३६ ४८ ६.५

चांदूर बाजार ११०५ ५५ ५.०

चांदूर रेल्वे ५२५ १५ २.९

अंजनगाव ९५८ १५ १.६

अमरावती जिल्हा १२९९७ २३९१ १८.४

--------

सन २०१९ मध्ये

उद्दिष्ट १२९९२

शस्त्रक्रिया ५१५७

सन २०२० मध्ये

उद्दिष्ट १२९९७

शस्त्रक्रिया २३९१

कोट

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्जनद्वारा केल्या जातात. यासाठी नियोजित शिबिराचे आयोजन केले जातात. मात्र यंदा कोरोनामुळे शक्य तितकेच शिबिर घेता आले. त्यामुळे उद्दिष्ट गाठता आले नाही.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी.