आॅनलाईन लोकमतअमरावती : सूर्यमालेतील सूर्याच्या अत्यंत जवळचा बुध ग्रह १५ मार्च रोजी साध्या डोळ्यांनी दिसणार असल्यामुळे अमरावतीकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ही खगोलीय घटना सूर्य मावळल्यावर लगेत पश्चिम क्षितिजावर थोड्या वेळासाठी पाहता येणार असल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.बुध ग्रह हा सूर्यापासून अधिकाअधिक २८ अंक्षापर्यंत दूर जातो. हा ग्रह सूर्यापासून १८ अंक्षावर असताना सहज दिसू शकतो. सूर्यापासून बुध ग्रहाला जितका प्रकाश मिळतो, त्याचा ७ टक्के भाग बुध ग्रह परावर्तीत करतो. दुर्बिणीतून बुधाचे निरीक्षण केल्यावर सुंदर कडा दिसतात. या कडा साध्या डोळ्यांनी अनुभवता येऊ शकत नाहीत. साध्या डोळ्यांनी बुध ग्रह किंचित पिवळसर तेजस्वी दिसतो. बुध ग्रहाचे अधिक्रमण हा दुर्बिणीतून दिसणारा अपूर्व असा खगोलीय आविष्कार असल्याचे मत गिरुळकर यांचे आहे. बुधाला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करण्यास ८८ दिवसांचा कालावधी लागतो. या ग्रहाचे सूर्यापासून ५.८ कोटी किमि. अंतर असून त्याचा व्यास ४८०० किलोमीटर आहे. या ग्रहावर वातावरण नसून तेथे सजीवसृष्टी नाही. हा ग्रह सूर्याभोवती ४८ किमी. प्रतिसेंकद इतक्या सर्वात अधिक वेगाने फिरतो. हा ग्रह क्षितिजाजवळच दिसत असल्याने शहरी भागातील प्रकाशमय वातावरणात बुध ग्रह स्पष्ट दिसण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ग्रामीण किंवा अंधाºया वातावरण बुध ग्रहाला पाहण्याचा अनुभव घेता येऊ शकत असल्याचे मत गिरुळकर यांनी व्यक्त केले.
१५ मार्च रोजी साध्या डोळ्यांनी दिसणार बुध ग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:15 PM
सूर्यमालेतील सूर्याच्या अत्यंत जवळचा बुध ग्रह १५ मार्च रोजी साध्या डोळ्यांनी दिसणार असल्यामुळे अमरावतीकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ठळक मुद्देखगोलीय घटना : अमरावतीकरांमध्ये उत्सुकता