अमरावती : महापालिकेत मनुष्यबळ पुरविण्यासाठी नियुक्त एजन्सीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनामत रक्कम मागितल्याच्या कारणांवरून मंगळवारी विशेष सभेत युवा स्वाभिमानचा ‘गोंधळ’ मुंबईत पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. महापालिकेतील भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झालेला प्रकार नेत्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
महापौर चेतन गावंडे हे बुधवारी मुंबईला रवाना झाले असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी विशेष सभा आटोपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोनद्धारे आमदार रवि राणा यांच्या समर्थकांनी घातलेल्या ‘गोंधळा’ची माहिती दिल्याचे भाजपचे पक्षनेता तुषार भारतीय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा स्वाभिमानी ‘गोंधळ’ मुख्यमंत्री ठाकरे यांना कळविल्याची माहिती आहे.
-------------
काेट
मुंबईला कामानिमित्त जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असून, झालेला ‘गोंधळ’ त्यांच्या लक्षात आणून देऊ. बुधवारी मूक आंदोलनादरम्यान भाजप कार्यकत्यांच्या भावना तीव्र होत्या.
- चेतन गावंडे, महापौर.