शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

मेट्रोचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे

By admin | Published: February 01, 2017 12:05 AM

मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली असता...

मध्य रेल्वेचे रवि राणांना पत्र : महानगरात थांबे देण्याबाबत होणार सर्वेक्षणअमरावती: मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली असता मध्य रेल्वे मुंबई विभागाने हा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. प्रस्तावित मेट्रोला महानगरात थांबे देण्यासंदर्भात आ. राणांसोबत रेल्वेचा पत्रव्यवहार सुरू आहे. त्यानुसार लवकरच बडनेरा ते नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीदरम्यान मेट्रो सुरू होईल, असे संकेत आहेत.पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना साकडेअमरावती : आ.रवि राणा यांनी निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमरावती महानगरात मेट्रो सुरू करण्याबाबत साकडे घातले आहे. त्यानुसार आ.राणांनी मध्य रेल्वे मुंबईच्या महाप्रबंधकांना बडनेरा ते एमआयडीसी दरम्यान मेट्रो सुरु करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई विभागाचे उपमहाव्यवस्थापक दिनेश वशिष्ठ यांनी मेट्रोच्या प्रस्तावाला पुढे मान्यतेसाठी रेल्वे मंत्रालयात पाठविले जाईल, असे आ. रवि राणांना १८ जानेवारी रोजी एका पत्राद्वारे कळविले आहे. मेट्रोच्या थांब्याबाबतही लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्याचा झपाट्याने विकास आणि विस्तार होत असल्याच्या पार्श्वभूमिवर मेट्रो सुरु करण्याच्या मागणीने यात विकासात्मक वाढ होईल, असे आ. राणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. मेट्रोच्या प्रस्तावात महानगराचा प्रमुख भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गलतच्या बडनेरा व नांदगाव पेठ या दोन शहरांना मेट्रोने जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात विविध उद्योग साकारले जाणार आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंद्याना कामगार, कुशल मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे बडनेरा शहरालगतच्या गाव-खेड्यातून मोठ्या संख्येने कामगार, मजूर दरदिवशी शहरात येतात. परंतु भविष्यात नांदगावपेठ एमआयडीसीतील कारखाने, उद्योगधंद्यांना लागणारे कामगार, मजुरांना ये-जा करता यावी, यासाठी मेट्रो हे सुलभ व स्वस्त साधन ठरेल, असे आ. रवि राणा यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)या स्थळांचे होणार सर्वेक्षणबडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसी दरम्यान मेट्रो सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. भविष्यात मेट्रोला कुठे थांबे द्यावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. यात बडनेरा, साईनगर, गोपालनगर, नवाथे, राजापेठ, राजकमल चौक, कॉटनमार्केट चौक, इर्विन चौक, पंचवटी, अर्जुननगर, रहाटगाव, नांदगाव पेठ या स्थळांचे सर्वेक्षण होणार आहे.अमरावती महानगरात मेट्रो सुरू व्हावी, ही माझी स्वप्नपूर्ती आहे. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधकांकडे प्रस्ताव सादर केला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले असून मेट्रोचा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयात पाठविण्यात आल्यामुळे मार्ग सुकर झाला आहे.- रवि राणा, आमदार, बडनेरा