मनीष कहाते ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शिवटेकडीनजीक म्हाडाच्या कार्यालय परिसरातील इमारतीचे बांधकाम मागील पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. परंतु संबंधित ठेकेदाराने अद्यापही सदर इमारतीचे हस्तांतरण केलेले नाही. त्यामुळे टोलेजंग इमारत भंगार अवस्थेत धूळ खात आहे.सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून म्हाडाने चार मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. केवळ तांत्रिक अडचणींमुळे इमारतीचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सन २००९ मध्ये सुरुवात झाली. दोन वर्षांत इमारतीचे काम पूर्णत्वास आले. दारे, खिडक्या, टाइल्ससुद्धा लागल्यात. रंगरंगोटीदेखील पूर्ण झाली आहे. सदर इमारत सहा मजली बांधण्याचे नियोजन झाले होते. परंतु, तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून चार मजली बांधण्यात आली. सध्या इमारतीच्या परिसरात प्रचंड गवत वाढले असून, भिंतीला जाळे लागले आहेत. दारे, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. आजूबाजूला कचºयाचे ढिगारे वाढले आहे. टाइल्स, मार्शलचे तुकडे विखुरले आहेत. त्यामुळे शासनाने आठ कोटी रुपये खर्चातून सदर इमारत बांधल्याचा लाभ मात्र कुणीच घेताना दिसत नाही. इमारतीत केवळ टेबल, खुर्ची आणि फर्निचरचे काम बाकी आहे. त्यासाठी दीड कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आणि अंतर्गत सजावटीच्या कामाला सुरुवात होईल व त्यानंतर उद्घाटन होणार आहे.पूर्वी आठ कोटींचे अंदाजपत्रक होते. परंतु, दोन मजले बांधकाम रद्द करण्यात आल्यामुळे सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १ मे रोजी इमारतीचे उद्घाटन व्हावे, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.- सुभाष शिंदे,मुख्याधिकारी, म्हाडा
म्हाडाची आठ कोटींची इमारत भंगार अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:39 PM
शिवटेकडीनजीक म्हाडाच्या कार्यालय परिसरातील इमारतीचे बांधकाम मागील पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले.
ठळक मुद्देउद्घाटनाची प्रतीक्षा : टाइल्स फुटल्या, दरवाजे तुटले