शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

तक्रारी असलेल्या मद्य विक्रीची दुकाने स्थलांतरित करा

By admin | Published: September 10, 2015 12:07 AM

ज्या मद्यविक्रीच्या दुकानामुळे सर्वसामान्य व्यक्ती तसेच महिला व विद्यार्थ्यांना असुविधा निर्माण होत आहे.

पालकमंत्री : उत्पादन शुल्क विभागाचा आढावाअमरावती : ज्या मद्यविक्रीच्या दुकानामुळे सर्वसामान्य व्यक्ती तसेच महिला व विद्यार्थ्यांना असुविधा निर्माण होत आहे. या दुकानांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी मद्य विक्रीची दुकाने तत्काळ चौकशी करुन स्थलांतरित करा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पालकमंत्र्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी किरण गित्ते, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षिका उषा वर्मा बैठकीला उपस्थित होत्या. दारु दुकानं हटविण्याबाबत काही भागातील नागरीकांच्या पालकमंत्र्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्यात या तक्रारींवर योग्य चौकशी करण्या बाबत त्यांनी निर्देश दिलेत.शहरातील वडाळी, फ्रेजरपुरा, नवसारी, भाजीबाजार तसेच आष्टी, वलगाव, घुईखेड येथे दारु दुकानांमुळे त्या परिसरातील नागरीकांना त्रास होत असल्याची माहिती पालकमंत्र्यानी दिली. ज्या मद्य विक्री दुकानाबाबत तक्रारी आहेत त्या दुकानांचे स्थलांतरण नागरिकांना त्रास होणार नाही अशा अन्य ठिकाणी करावे. संबंधित परवाना धारकांना न्यायालयाची स्थगिती मिळणार नाही, अशी कायदेशीर ठोस कार्यवाही करावी. मद्यविक्री दुकान चालविण्याचा परवाना ज्यांचे नावे आहे त्या व्यक्तीनेच प्रत्यक्षात दुकान चालवावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.राज्य उत्पादन शुल्क च्या वतीने अवैध मद्य विक्री दुकानांवर नोंदविण्यात आलेले गुन्हे, जप्त केलेला मुद्देमाल तसेच अटी व शर्तीचा भंग केलेल्या परवानाधारकांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती अधीक्षिका उषा वर्मा यांनी दिली. १४ अनुज्ञप्ती (मद्यविक्री परवाने) बाबत लोकांच्या तक्रारी आहेत त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)