आॅनलाईन लोकमतअमरावती : देशविदेशीतील विविध प्रजातींचे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यातील २४ जलाशयांवर पाहुणे बनून आले आहेत. स्थानिक पक्ष्यांसोबत देशी-विदेशांच्या किलबिलाटाने जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरण बहरले आहे. मात्र, या पाहुण्यांना जल-वायुप्रदूषणाचा धोका कायमच असल्याचे आढळून येत आहे.हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांत दूरदेशीच्या पाहुण्यांचे जिल्ह्यातील जलाशयावर येतात. काही रानपक्षीही स्थलांतर करून येतात. अन्नाची कमतरता, थंडीत जलाशय गोठल्यामुळे खाद्यान्नाची अनुपलब्धता, संतुलित व सुरक्षित वातावरण, विणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित जागा व परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे हे पक्षी स्थलांतर करतात. भारतात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागांतून हे पक्षी जिल्ह्यात आले आहे. काही पक्षी २० हजार ते ५४ हजार कि.मी.पर्यंतचा प्रवास ताशी ४० ते ६० कि.मी.च्या वेगाने गाठतात. स्थलांतरणात पक्षी दिवसा व रात्रीही प्रवास करतात. हिमालयाकडून केरळ भागात म्हणजेच पक्ष्यांचे स्थलांतर हे देशांतर्गतही असते. काहीचे आर्टिक्ट ते अंटार्टीक म्हणजे देशाबाहेरूनही आपल्याकडे येतात. सायबेरियामधून येणारे कांड्या करकोचा व साधा करकोचा यांचे अजून दर्शन झाले नसल्याचे यादव तरटे पाटील, अनुश्री तरटे पाटील, क्रांती रोकडे, कपिल काळे, स्वप्निल रायपुरे यांनी सांगितले.जिल्ह्यात दुर्मिळ पक्षांच्या नोंदीवन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी केलेल्या पक्षिनिरीक्षणात सोनटिटवा, तनई, राजहंस, गजरा, परी, सरग, चिमण, शेंद्र्या, लहान रेव टिटवा, पान टिलवा, मोठा पानलावा, छोटा टिलवा, जलरंक, तपकिरी डोक्याचा कुरव, गंगा पानलावा, शेंडी बदक या पक्ष्यांनी अमरावती जिल्ह्यातील नळ दमयंती सागर, केकतपूर, दस्तापूर, शेवती, सूर्यगंगा, घातखेड, पोहरा, मालखेड, सावंगा, इंदला, राजुरा व छत्री तलाव अशा २४ जलाशयांवर हजेरी लावली आहे. मेळघाट व पोहरा-मालखेड राखीव जंगल परिसरात कृष्ण थिरथिरा, निलय, राखी डोक्याची लिटकुरी, वरटी पाखरू हे रानपक्षीसुद्धा दिसून आले. यवतमाळ जिल्ह्यातील निळोना, शिंदी येथील तलावावर राजहंस व कृष्ण ढोकचे दर्शन झाले आहे.पर्यावरण संर्वधनात महत्त्वविदेशातील हे पाहुणे पक्षी पाण्यातील, हवेतील व वनस्पतीवरील असंख्य कीटकांना खातात. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. निसर्गाचे सफाई कामगार, उत्तम बीजप्रसारक व शेतकºयांचे मित्र अशी मुळात त्यांची ख्यातीच आहे. दुसरीकडे पक्ष्यांचा अभ्यास व निरीक्षणासाठी, निसर्गप्रेमींसाठी कुतूहल बनले आहे. जागतिक हवामान बदल व वनसंवर्धांत पक्ष्यांचे स्थलांतर अनेक अंगाने लाभदायी आहे.मानवी हस्तक्षेपाचा धोकाजलाशय व जगंलात आता मानवी हस्तक्षेप वाढला असून, तो पक्ष्यांसाठी धातक ठरत आहे. त्यातच जलाशयाकडे अतिमासेमारीमुळे पक्षी पाठ फिरवतात. पक्षी शिकाºयांच्या व मासेमारीच्या जाळ्यात अडकतात. तलावातील प्लास्टिकच्या पिशव्या पक्ष्यांना धोकादायक ठरतात. यातूनच या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमीकमी होत आहे. हे पक्षी वर्षानुवर्षे येतात व हिवाळा संपल्यावर उन्हाळ्याची चाहूल लागताच मूळ स्थानी परत जातात.निसर्गाचे संतुलनात पक्षांचा मोठा वाटा आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. या पक्ष्यांना अभय देणे आवश्यक आहे. तलाव व नद्या प्लास्टिकमुक्त करणे आवश्यक आहे.- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक
२४ जलाशयांवर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:04 PM
देशविदेशीतील विविध प्रजातींचे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यातील २४ जलाशयांवर पाहुणे बनून आले आहेत.
ठळक मुद्देदेश-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट : प्रदूषणाचा धोका कायमच