अमरावती : अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिलखदरा, अंजनगाव सूर्जी, अचलपूर या तालुक्यासह काही गावांमध्ये सोमवारी दुपारी १ वाजून ३७ मिनीटांनी भूकंपाचे सौम्य झटके बसले. दोन सेकंदाच्या या भूकंपाच्या झटक्याने नागरिक हादरून गेलेत. अचानक जमीन हालल्यामुळे अनेकांना काहीतरी झाले, याचा भास झाला. जवळील नातेवाईक, मित्रांनी एकमेकांना या भूकंपाच्या सौम्य झटक्याबाबत विचारणा केली. मात्र यात कोणतीही वित्त अथवा जिवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. या भूकंपाच्या झटक्याची ४.२ रिक्टर स्केल एवढी नोंद करण्यात आली आहे.
गाव-खेड्यातील ग्रामस्थ या सौम्य झटक्याने हादरून गेले आहेत. जाणवला. परतवाडा येथे ब्राह्मण सभेत पलंग हालले. डायनिंग टेबल हल्ला. टीन हालले. जमिनीतून सौम्य असा आवाजही आला. शहरात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र या सौम्य झटक्याचा अनुभव अनेकांना आला. भूकंपाचे सौम्य झटके जाणवताच लोक आश्चर्यचकित होत घराबाहेर यायला सुरुवात केली व एकमेकांना जमीन हलत असल्याबाबत विचारणा करू लागले. तर पंचक्रोशीतूनही हो..हो जमीन हलली, असा निरोप येताच थोड्या वेळ काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच एकमेकांना बाहेरून कॉल यायला सुरुवात झाली. तिकडून पण जमीन हलल्याचे संदेश एकमेकांना मिळू लागले. जमीन हलल्याचे एकमेकांना मोबाईल कॉल आले. सध्या स्थितीत कोणत्याही तालुक्यात घर कोसळले, घराला भेगा पडणे, जमिनीला भेगा अशा प्रकारे कुठेही निर्दशनास आले नाही. या भूकंपाच्या सौम्य झटक्याची जाणीव सातपुडा पर्वत रांगेलगतच्या धारणी, चिखलदरा, अंजनगाव सूर्जी, अचलपूर या चार तालुक्यांना बसल्याची माहिती आहे.