शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

अपघातानंतर जमावावर सौम्य लाठीचार्ज

By admin | Published: February 25, 2016 12:03 AM

अपूर्वा देऊळकर हिच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच मार्गावर एका ट्रकने रिव्हर्स घेताना तीन दुचाकींना धडक दिल्याने ...

अंबादेवी-गांधी चौक मार्गावरील घटना : ट्रकची तीन दुचाकींना धडकअमरावती : अपूर्वा देऊळकर हिच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच मार्गावर एका ट्रकने रिव्हर्स घेताना तीन दुचाकींना धडक दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अंबादेवी ते गांधी चौक दरम्यान घडलेल्या या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड करून ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना नागरिकांची गर्दी पांगवीण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. माहितीनुसार मंगळवारी रात्री अंबादेवी मार्गाने गांधी चौकाकडे जाणाऱ्या ट्रक एमएच ३१-९५९९ अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने चालकाने ट्रक विरुध्द दिशने मार्गालगत नेऊन थांबविला. तेथून तो ट्रक मागे घेण्यासाठी चालकाने रिव्हर्स घेतला असता अचानक मागून येणाऱ्या एम.एच. २७ ए.सी.-२६३१, टी.सी.एम.एच. २७ व एम.एच. २७ बी. १७८३ या तिन्ही दुचाकींवर जाऊन धडकला. सुदैवाने या अपघाताच प्राणहानी झाली नाही. मात्र, एका दुचाकीचे नुकसान झाले. या अपघाताची माहिती आजूबाजूच्या परिसरात पसरताच काही वेळात शेकडो नागरिकांची गर्दी घटनास्थळी गोळा झाली. अपूर्वा देऊळकर हिचा मृत्यू चुनाभट्टीजवळच झाला होता. पुन्हा ट्रकने एकास चिरडल्याची अफवा चुना भट्टीत परिसरात पसरल्याने काही नागरिक अपघातस्थळी धावून गेले. काही संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक सुरु केली.ट्रकच्या काचा फोडून ट्रक जाळण्याचा प्रयत्न सुध्दा केला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस उपायुक्त नितीन पवार पोलिसांचा ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. संतप्त नागरिक ट्रकची तोडफोड करताना पोलिसांना आढळून आले. तसेच ट्रक जाळण्याचा बेतात असताना पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवली. मात्र, या अपघातामुळे गांधी चौक परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुध्दा लावण्यात आला. शहर कोतवाली पोलिसांनी ट्रक जप्त केला. ट्रकचालक बडनेरा येथील रहिवासी अजय तुमसरेला ताब्यात घेतले. नगरसेवक दिनेश बूब यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली.