लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आॅपलाईन परीक्षेशी संबंधित ‘एन्ड टू एन्ड’ कामाची जबाबदारी असलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सीला विद्यापीठातून कायमचे हद्दपार करण्यात आले. आता परीक्षा केंद्रावर प्रश्र्नपत्रिकांचे वितरण सारणी विभागातून केले जाणार आहे.सन २०१६ मध्ये आॅनलाईन परीक्षांच्या कामासाठी विद्यापीठात कराराद्वारे आलेल्या ‘माइंड लॉजिक’ एजन्सीला तीन वर्षांतच गाशा गुंडाळावा लागला. गत तीन वर्षांत एकदाही वेळेवर निकाल लागले नाही. परीक्षेचे आॅलनाईन कामकाज असताना १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधी होऊनही निकाल लावण्यात आले नाही. परिणामी विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांचे मोर्चे, व्यवस्थापन परिषद सभा आणि सिनेट अधिसभेत ‘माइंड लॉजिक’च्या अफलातून कारभारामुळे विद्यापीठ प्रशासनावरून नामुष्की ओढावली होती. नुकत्याच झालेल्या उन्हाळी २०१९ परीक्षेत ‘माइंड लॉजिक’कडे प्रश्नपत्रिका पाठविण्याचे कामे सोपविली होती. ती आता हिवाळी परीक्षेसाठी काढून घेण्यात आली आहे. विद्यापीठ परीक्षा व मूल्यांकन विभागाने ‘माइंड लॉजिक’ एजन्सीला पूर्णत: बाहेर काढण्यासाठी तयारी केली आहे. काही महिन्यांपासून या कंपनीकडे विद्यार्थ्यांचा असलेला डेटा हळूहळू विद्यापीठाने गोळा केला आहे. या कंपनीचे विद्यापीठाकडे देयकांपोटी असलेली थकीत रक्कमदेखील अद्याप देण्यात आलेली नाही. मध्यतंरी या एजन्सीविरूद्ध दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख आदींनी महत्वाची भूमिका बजावली आहे.सिनेट अधिसभेत दिलेला शब्द कुलगुरूंनी पाळलाविद्यापीठात ‘माइंड लॉजिक’ राहिल्यास भविष्यात चहापान्यालासुद्धा अधिकारी, कर्मचारी त्रस्त होतील. त्यामुळे कसेही करून ही एजन्सी विद्यापीठातून हद्दपार करावी, अशी मागणी सिनेट अधिसभेत सदस्यांनी रेटून धरली होती. दरम्यान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ‘माइंड लॉजिक’कडून टप्प्याटप्प्याने कामे काढून घेतली जाईल. त्यानंतर ही एजन्सी विद्यापीठात दिसणारसुद्धा नाही, असा शब्द त्यांनी सिनेट अधिसभेत दिला होता. त्यानुसार परीक्षापूर्व आणि परीक्षोत्तर कामे काढून घेतली आहे. सिनेट सभेत प्रवीण रघुवंशी, संतोष ठाकरे, विवेक देशमुख, सुभाष गावंडे, दीपक धोटे, बी.आर. वाघमारे, अमोल ठाकरे, मनीष गवई आदींनी ‘माइंड लॉजिक’वर ताशेरे ओढले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सभागृहात गदारोळ करून ही एजन्सी हाकलून लावण्याची मागणी केली होती.
विद्यापीठातून ‘मार्इंड लॉजिक’ कायम हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:14 PM
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आॅपलाईन परीक्षेशी संबंधित ‘एन्ड टू एन्ड’ कामाची जबाबदारी असलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सीला विद्यापीठातून कायमचे हद्दपार करण्यात आले. आता परीक्षा केंद्रावर प्रश्र्नपत्रिकांचे वितरण सारणी विभागातून केले जाणार आहे.
ठळक मुद्देकामकाज काढले : प्रश्नपत्रिकांची वितरण सारणी विभागातून