घरे उजळण्याची योजना : निवडलेल्या घरांना कर्ज परतफेडीसाठी अवधीसुदेश मोरे अंजनगाव सुर्जीविजेच्या बिलात बचत करून ग्राहकांचे पैसे वाचविण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी केंद्रीय ऊर्जा पुनर्वापर मंत्रालयाने घरोघरी सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आखली आहे. या ऊर्जेमधून घर उजळण्यासोबतच पुढील ६ वर्षांत अशा घरांमधून निर्माण झालेल्या अतिरिक्त सौर ऊर्जेचे उत्पादन चाळीस हजार मेगावॅटपर्यंत नेण्याचे या मंत्रालयाचे उद्दिष्ट्य आहे. सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी निवडलेल्या घरांना कर्ज देऊन त्यांची परतफेड ६ वर्षांत करणे आणि निर्मित उर्जेव्दारा घरमालकांना नियमित उत्पन्न मिळवून देणे अशा पूरक उद्देशाने ही योजना देशात राबविली जाईल.घरोघरी सौरउर्जा उत्पादित करून अशा घरांची वीज गरज भागविल्यानंतर अतिरिक्त निर्माण झालेली वीज ही राष्ट्रीय विद्युत वाहिनीशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. घरगुती व्यावसायिक, औद्योगिक जागतासोबत निरनिराळ्या संस्थांच्या इमारतीवर सौरपॅनल या योजनेमधून स्थापित केले जातील व स्थानिक वाहिनीमार्फत राष्ट्रीय विद्युत वाहिनीशी जोडले जातील. घरगुती सौरऊर्जा निर्मितीसाठी १५ टक्के अनुुदान दिले जाईल. व्यावसायिक व औद्योगिक ठिकाणी सौर ऊर्जा उत्पादकांना सर्वाधिक अबकारी व इतर कर सवलतींसोबत १० वर्षांच्या जागेचा व घराचा कर माफ करण्यात येईल. गरजू व्यक्तींना दहा टक्के दराने कर्जपुरवठा केला जाईल. दहा लाख रुपयांपर्यंत या योजनेसाठी वैयक्तिक कर्ज दिले जाईल, अशी माहिती नवीन व ऊर्जा पुनर्वापर मंत्रालयाने दिली.
स्मार्ट घरांसाठी ऊर्जा पुनर्वापर मंत्रालयाचा पुढाकार
By admin | Published: January 02, 2016 8:29 AM